मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटने देशभरात खळबळ उडाली असतानाच बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर धक्कादायक वक्तव्य केले आहे. रणवीर सिंगवर न्यूड फोटोशूट केल्यामुळे एफआयआरही नोंदवण्यात आला असला तरी त्याचे बॉलिवूड कुटुंबीय समर्थन करताना दिसत आहेत. आता विद्या बालनने धक्कादायक वक्तव्य करत रणवीर सिंगचा बचाव केला आहे.
विद्याचे वक्तव्य - सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विद्या बालन अभिनेता रणवीर सिंगच्या वादग्रस्त न्यूड फोटोशूटचे खुलेपणाने समर्थन करताना दिसत आहे. या फोटोशूटवर पापाराझींनी तिला प्रतिक्रिया विचारताच अभिनेत्री म्हणाली, 'काय प्रॉब्लेम आहे, पहिल्यांदाच एक माणूस असं करतोय.. आम्हालाही थोडे नेत्रसुख घेऊ द्या ( हमें भी आँखे शेकने दो )', असं बोलल्यावर विद्या जोरात हसायला लागते. त्याचे उत्तर ऐकून तेथे उपस्थित लोकही हसू लागतात. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एफआयआरवर काय म्हणाली अभिनेत्री - वादग्रस्त फोटोशूटमुळे रणवीर सिंगवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यावर विद्याने म्हटले आहे की, ''ज्यांनी रणवीर सिंगवर गुन्हा दाखल केला आहे, ते रिकामे लोक आहेत. त्यांच्याकडे जास्त वेळ आहे, त्यामुळे ते फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवत आहेत. विद्याने उघडपणे सांगितले की, जर या फोटोमध्ये काही अडचण असेल तर बघू नका. या एफआयआरचे प्रकरण काय आहे, ही गोष्ट समजण्यापलीकडची आहे.''
विद्या बालनचा वर्कफ्रंट - विद्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची 'जलसा' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 18 मार्च रोजी OTT वर प्रदर्शित झाला होता. यावर्षी विद्या 'नियत' चित्रपटात दिसणार आहे. 'शकुंतला देवी' या चित्रपटाचे दिग्दर्शक मेनन यांच्यासोबत ही अभिनेत्री या चित्रपटात काम करत आहे.
हेही वाचा - 'रूप नगर के चीते' चित्रपटाच्या दुसऱ्या टिझरने कथानकाची उत्सुकता वाढवली