ETV Bharat / entertainment

Hua Mai Song Out : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल'मधील 'हुआ मैं' हे गाणं झालं प्रदर्शित; पहा व्हिडिओ... - हुआ मैं

Hua Mai Song Out : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' हा रुपेरी पडद्यावर दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान आता या चित्रपटातील 'हुआ मैं' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

Hua Mai Song Out
हुआ मैं गाणं रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 4:04 PM IST

मुंबई - Hua Mai Song Out : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य जोडी पहिल्यांदाच 'अ‍ॅनिमल' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील 'हुआ मैं' हे पहिले गाणे कालपासून चर्चेत आहे. मंगळवारी, 10 ऑक्टोबर रोजी या गाण्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. याशिवाय 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची रिलीजची तारीख देखील जाहीर केली होती. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मिका विमानात एकमेकांना किस करताना दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'गाणे हुआ मैं' बद्दल : 'अ‍ॅनिमल' चित्रपटामधील पोस्टर, टीझर आणि ट्रेलरनंतर आता चित्रपटामधील 'हुआ मैं' गाणं रिलीज झालं आहे. या चित्रपटातील गाण्याला प्रीतमनं संगीत दिले आहे. 'हुआ मैं' गाण्याचे बोल मनोज मुंतशिर यांनी लिहिले असून हे गाणं गायक राघवसह प्रीतमनं गायले आहे. गाण्याच्या सुरुवातीला रश्मिका आणि रणबीरला घरच्यांकडून फटकारलं जातं आहे. त्यानंतर पुढच्या काही क्षणातचं हे जोडपे कुटुंबातील सदस्यांसमोर एकमेकांना लिप किस करतात. त्यानंतर हे जोडपे प्रायव्हेट जेटमध्ये जातात. त्यानंतर हे दोघेही जेटमध्ये देखील किस करतात. चित्रपटातील रश्मिकाच्या पात्राचे नाव गीतांजली आहे.

'अ‍ॅनिमल' चित्रपट कधी होणार प्रदर्शित : या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील आहेत. 'अ‍ॅनिमल' या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटाची वाट चाहते अनेक दिवसांपासून पाहत आहेत. 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांचा फर्स्ट लूक यापूर्वीच समोर आला आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये अनिल कपूर रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय बॉबी देओल हा या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका करत आहे. बॉबीनं या भूमिकेसाठी मोठ्या प्रमाणात परिवर्तन केले असून टीझरमधील त्याचा कॅमिओ खूपच मनोरंजक आहे.

हेही वाचा :

  1. Nushrratt Bharuccha : युद्धग्रस्त इस्रायलमधून परतल्यानंतर नुसरत भरुचानं पहिला व्हिडिओ केला शेअर ; भारत सरकारचे मानले आभार...
  2. Tiger 3 trailer release date : 'टायगर 3' च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली, पोस्टरसह रिलीज तारखेची झाली घोषणा...
  3. Amitabh bachchan birthday : अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त्यांनं त्यांच्या टॉप पाच चित्रपटाबद्दल जाणून घ्या....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.