मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा कमी तर नात्यापेक्षा जास्त चर्चेत आहे. त्याचा शेवटचा चित्रपट 'विक्रम वेधा' हा (2022) मध्ये आला होता. यानंतर तो कुठल्याही चित्रपटात दिसला नाही. नुकताच तो आपल्या गर्लफ्रेंड सबा आझादसोबत डेट नाईटवर स्पॉट झाला होता. हृतिक हा गर्लफ्रेंड सबासोबत जुहूमध्ये चित्रपट पाहायला गेला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हृतिकने त्याच्या मोठ्या मुलाला हृधनला डेटवर रात्री सोबत घेवून गेला होता. यावेळी त्याला त्याच्या फॅप्सने अडविले होते. फॅन्सच्या गर्दीमुळे एक छायाचित्रकार खाली पडला. त्यानंतर हृतिकने फोटोग्राफरला फोटो काढताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आणि तो तिथून निघून गेला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हृतिक रोशन आणि गर्लफ्रेंड सबा : जूहूमध्ये हृतिक रोशनला आणि सबाला जेव्हा स्पॉट केले तेव्हा त्याने ब्राउन पॅन्ट, ग्रे टी-शर्ट, हुडी, शिवाय डोक्यावर कॅज्युअल टोपीही घातली होती. तर दुसरीकडे, सबा आझादने आईस वॉश डेनिम्सवर ब्लॅक टॉप घातले होते. या लूकमध्ये ती छान दिसत होती. हृतिकचा मुलगा ऑल ब्लॅक लूकमध्ये यावेळी दिसला. याठिणी हृतिक रोशन आणि सबाला हे दोघे एकत्र दिसल्यानंतर फॅन्सनी गर्दी केली. काही फॅन्सनी त्यांचे फोटो काढले तर काही फॅन्सने त्यांच्यासोबत एकत्र सेल्फीही घेतल्या. यानंतर हृतिक-सबा तेथून एकाच गाडीतून निघाले. हृतिक रोशनची पुर्वी पत्नी सुझेन खान ही देखील बऱ्याचदा सबासोबत पार्टी करतांना दिसते.
हृतिक आणि पुर्वी पत्नी सुझेन खान : हृतिक आणि त्यांची पूर्व पत्नी सुझेन हे दोघे जरी विभक्त झाले असले तरी आजही त्यांच्यात चांगली मैत्री आहे. बरेचदा सुझेन ही हृतिकच्या घरी देखील जात असते आणि त्यांच्या मुलांना भेटत असते. विभक्त झाल्यावर हृतिक आणि सुझेन आपल्या आपल्या मार्गाने समोर गेले आहे. हृतिक रोशनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो त्याच्या आगामी एरियल अॅक्शन चित्रपट फायटरमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती 'पठाण' दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केली आहे. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच हृतिकसोबत दीपिका पदुकोण जोडी ही प्रेक्षकांना पाहयला मिळणार आहे. हृतिक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करेल हे येणारा काळच ठरवेल.
हेही वाचा : Hollywood writers strike : हॉलिवूडमधील लेखकांच्या संपामुळे मार्वल स्टुडिओने ब्लेडचे शुटिंग पुढे ढकलले