ETV Bharat / entertainment

Hrithik Roshan goes shirtless : व्हिटॅमिन धूप मिळवण्यासाठी हृतिक रोशन झाला शर्टलेस, चाहते खूश - चाहत्यांसाठी शर्टलेस फोटो

हृतिक रोशनने बुधवारी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शर्टलेस फोटो शेअर करुन खूश केले. सकाळच्या उन्हात टेरेसवर व्यायाम करत असताना चा फोटो त्याने शेअर केला आहे.

Hrithik Roshan goes shirtless
हृतिक रोशन झाला शर्टलेस
author img

By

Published : Jun 14, 2023, 6:49 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या ऍथलेटिक शरीरासाठी ओळखला जातो आणि तो नेहमीच आपली शरीरयष्टी मजबूत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. बुधवारी त्याने शर्टलेस फोटो शेअर करुन इंटरनेटवर धुरळा उडवून दिला. फोटोला त्यान दिलेले कॅप्शन चाहत्यांचे लक्ष वेधणारे होते. त्याने लिहिले, 'जेव्हा तुम्हाला वेगाने शेअर करायचे असते तेव्हा व्हिटॅमिन धूप शिवाय उत्तम दुसरे काही असू शकत नाही. पिवळ्याचे निळे होण्यापूर्वी भिजत राहा.'

त्याच्या कॅप्शनमध्ये, हृतिकने 'D'hoop' असे लिहून त्याच्या २००३ च्या 'कोई मिल गया' चित्रपटातील जादू या पात्राचा संदर्भ दिला, जो 'धूप' (सूर्यप्रकाश) वर चार्ज होत असतो. फोटोत हृतिक त्याच्या टेरेसवर उन्हामध्ये ( व्हिटॅमिन धूप ) भिजताना दिसत असून तो व्यायाम करताना दिसत आहे. या फोटोत व्यायाम करताना त्याने फोटो घातलेला नाही. त्याने यावेळी डेनिम जीन्ससह पिवळी बेसबॉल कॅप आणि चष्मा घातलेला होता.

हा फोटो शेअर केल्यानंतर, हृतिकच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. फॉलोअर्समध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या हृतिकच्या नव्या पोस्टसाठी ते नेहमीच उत्सुक असतात. अनेक चाहत्यांचा तो प्रेरणास्थान आहे, त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेकांचा तो खर्या आयुष्यातील सुपरहिरो आहे, त्यामुळे चाहत्यांनी भरभरुन फोटोचे कौतुक करत त्याला प्रोत्साहन दिले आहे.

दरम्यान, सुझान खानपासून विभक्त झाल्यानंतर हृतिक रोशन अलिकडे सबा आझादसोबत डिटेंग करत आहे. अनेक पार्ट्या, डिनर डेट्स समारंभ, विवाह आणि प्रीमियरला तो सबासह हजर असतो. अनेकदा दोघांच्या फोटोवर त्याची पूर्व पत्नी सुझानही प्रतिक्रिया देताना दिसली आहे. लवकरच दोघेही विवाह बंधनात अडकतील असा विश्वास कुटुंबीयांसह त्याच्या चाहत्यांनाही वाटतो.

वर्क फ्रंटवर, हृतिक रोशन सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. सिद्धार्थ आनंदच्या फायटर या अ‍ॅक्शन चित्रपटात तो दीपिका पदुकोण आणि अनिल कपूरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, ज्युनियर एनटीआरसोबत त्याचा वॉर 2 देखील चित्रपट असणार आहे.

हेही वाचा -

१. Comedian Suicide Attempt :लाइव्ह कॅमेऱ्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न, नाना पाटेकरची मिमिक्री करतो तीर्थानंद राव

२. Adipurush box office : आदिपुरुषची विक्रमी तिकीट विक्री, २००० ची तिकीटे संपली

३. Priyanka Chopra Jonas Family : पाहा, प्रियांका चोप्रा जोनासच्या कुटुंबीयांचे सुंदर आणि प्रेमळ फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.