ETV Bharat / entertainment

Hrithik Roshan and Saba Azad : सबा आझादने हृतिक रोशनसोबत घालवला चांगला वेळ ; सोशल मीडियावर फोटो शेअर - सुझैन खान

हृतिक रोशन आणि त्याची लेडीलव्ह सबा आझाद एकत्र अर्जेंटिनामध्ये आपला चांगला वेळ घालवत आहेत. सबाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हे कपल खूप आनंदी दिसत आहे.

Hrithik Roshan and Saba Azad
सबा आझाद आणि हृतिक रोशन
author img

By

Published : Jul 28, 2023, 1:03 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या चित्रपटांमुळे कमी आणि त्याच्या नवीन नात्यामुळे जास्त चर्चेत आहे. पत्नी सुझैन खानपासून विभक्त झाल्यानंतर हृतिक हा सबा आझादला डेट करत आहे. दरम्यान हृतिक आणि सबा पहिल्यांदा मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटवर दिसले होते. हे जोडपे अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच हृतिक त्याच्या नात्याबद्दल कधीच मीडिया समोर बोलत नाही, मात्र आता हृतिक सबावरील प्रेम जाहीरपणे व्यक्त करत आहे.

अर्जेंटिनाला गेले : सध्या हृतिक रोशन आणि सबा आझाद त्यांचा डेट एन्जॉय करण्यासाठी अर्जेंटिना येथे गेले आहेत. येथून सबा आझादने तिच्या इन्स्टा स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये हृतिक आणि सबा खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहेत. दरम्यान सबा आझादने एका फोटोत हृतिकसाठी 'हिप्पो हार्ट' असे लिहिले आहे. म्हणजे सबा प्रेमाने हृतिकला हिप्पो हार्ट मानते. या फोटोमध्ये हृतिक रोशन काळ्या स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत या कपलने उबदार कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये दोघे सुंदर दिसत आहेत. सबा आणि हृतिकचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडत आहे. या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे.

Hrithik Roshan and Saba Azad
सबा आझाद आणि हृतिक रोशन

चाहत्यांना आवडले फोटो : हृतिक आणि सबाच्या या फोटोवर एका चाहत्याने लिहिले आहे, 'राम मिलाई जोडी'. दुसरा चाहता लिहिले, 'आता तुझी जोडी आवडली आहे'. तसेच काही कमेंटमध्ये या कपलला लग्न करण्याचे सांगितले आहे. या पोस्टवर खूप कमेंट येत आहे. हृतिक रोशन सध्या त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत अर्जेंटिनामध्ये सुट्टी घालवत आहे. हृतिक आणि त्याची पूर्व पत्नी सुझैन खानला दोन मुले असून त्यांची नावे, रेहान आणि रिधान आहेत. तसेच हृतिक आणि सुझानमध्ये आता चांगली मैत्री आहे. सध्या सुझैन अर्स्लन गोनीला डेट करत आहे.

Hrithik Roshan and Saba Azad
सबा आझाद आणि हृतिक रोशन

हृतिक रोशन आणि सुझैन खानचा घटस्फोट : हृतिक रोशनने २०१४ मध्ये सुझैन खानपासून घटस्फोट घेतला होता. यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. सबापूर्वी, तो मॉडेल सामंथा लॉकवुडसोबत देखील दिसला होता, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. दुसरीकडे, सबाविषयी बोलायचे झाले तर, तिने २००८ मध्ये आलेल्या 'दिल कबड्डी' या चित्रपटाद्वारे अभिनय विश्वात पदार्पण केले होते, मात्र तिला २०११ मध्ये आलेल्या 'मुझसे दोस्ती करोगे' या चित्रपटाद्वारे यश मिळाले.

  • वर्क फ्रंट : हृतिकच्या वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर तो लवकरच सिद्धार्थ आनंदच्या 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदा दीपिका पदुकोणसोबत झळकेल. हा चित्रपट पुढल्या वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. RARKPK Movie : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट रूपेरी पडद्यावर आज होणार प्रदर्शित....
  2. Captain Miller Teaser OUT :रुपेरी पडद्यावर धनुषचा थरार, डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या दृष्यांसह 'कॅप्टन मिलर'चा टीझर रिलीज
  3. Safed teaser: संदीप सिंग दिग्दर्शित 'सफेद' चित्रपटाचा टीझर रिलीज...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.