ETV Bharat / entertainment

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर'चा ट्रेलर 'या' तारखेला होणार प्रदर्शित - दीपिका पदुकोण

Fighter Trailer Date OUT : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनीत 'फायटर'चा ट्रेलर हा 15 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

Fighter Trailer Date OUT
फायटर ट्रेलरची तारीख समोर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 2:28 PM IST

मुंबई - Fighter Trailer Date OUT : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट 'फायटर' बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 'फायटर' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे. सध्या हृतिक आणि दीपिकाचे चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहत आहेत. 'फायटर' चित्रपटातील आतापर्यंत तीन गाणी आणि टीझर रिलीज झाला आहे. हृतिक आणि दीपिकाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसत आहे. दरम्यान 'फायटर'च्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'फायटर'चा ट्रेलर कधी होणार रिलीज : 'फायटर' हा 25 जानेवारी 2024 बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा 15 जानेवारीला रिलीज होणार आहे. आता चाहत्यांना ट्रेलर रिलीजसाठी आणखी 6 दिवस वाट पाहावी लागणार आहे. फायटरच्या निर्मात्यांनी याबाबत पुष्टी केलेली नाही. हृतिक रोशन उद्या म्हणजेच 10 जानेवारीला त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करणार आहे. 'फायटर' चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण व्यतिरिक्त करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, अनिल कपूर, संजीदा शेख, तलत अझीझ आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

'फायटर' चित्रपटाबद्दल : 8 जानेवारी रोजी 'फायटर' चित्रपटामधील तिसरे गाणे 'हीर आसमानी' रिलीज झाले होते. याआधी 'शेर खुल गए' आणि 'इश्क जैसा कुछ' ही दोन गाणी रिलीज झाली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. 'फायटर' चित्रपटामध्ये हृतिक रोशन हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानियाच्या भूमिकेत असेल. दुसरीकडे दीपिका स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ ​मिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अनिल कपूर कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या भूमिकेत झळकेल. हृतिक आणि दीपिकाच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर ह्रतिक 'क्रिश 4' आणि 'वॉर 2'मध्ये दिसणार आहे, तर दीपिका ही 'कल्कि 2898 एडी' आणि 'लव 4 एव्हर' चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. आमिर खानचा जावई नुपूर शिखरेनं केला लुंगी डान्स, पाहा व्हिडिओ
  2. जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा आणि धनुष यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रण
  3. 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांची ब्लॉकबस्टर ऑफर , 'इतक्या' पैशात पाहू शकाल चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.