ETV Bharat / entertainment

हिंदी दिवसानिमित्त हे स्पेशल बॉलिवूड चित्रपट जरूर पाहा

Hindi Diwas 2024 : आज 10 जानेवारी रोजी देशात हिंदी दिवस साजरा केला जात आहे. या प्रसंगी काही हिंदी चित्रपटसृष्टीतील सिनेमा आहेत, जे आज तुम्ही नक्की पाहायला पाहिजे.

Hindi Diwas 2024
हिंदी दिवस 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 2:58 PM IST

मुंबई - Hindi Diwas 2024 : आज देशभरात हिंदी दिवस साजरा केला जात आहे. हिंदी ही भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून देशभरात या भाषेचा आदर केला जातो. हिंदी भाषा ही प्रत्येकजणांना आता आकर्षित करत आहे. परदेशातील लोक देखील ही भाषा शिकत असल्याचं दिसून येतं. देशात प्रत्येक ठिकाणी ही भाषा समजली आणि बोलली जाते. या भाषेत आपण सोप्या पद्धतीनं संवाद साधू शकतो. हिंदी चित्रपटसृष्टीत हिंदीचा प्रचार करणारे आणि या भाषेची क्षमता दाखवणारे चित्रपट फार कमी आहेत. या यादीमध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटांपासून ते दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानपर्यंतच्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. आज हिंदी दिनानिमित्त आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल आम्ही सांगणार आहोत.

'नमस्ते लंडन' : अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'नमस्ते लंडन'मध्ये भारतीय सभ्यतेसोबतच हिंदीचे महत्त्वही चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. हा चित्रपट 2007 रोजी रिलीज झाला होता. विपुल अमृतलाल शाह यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यात ऋषी कपूर, अक्षय कुमार, कतरिना कैफ, नीना वाडिया, जावेद शेख, उपेन पटेल आणि क्लाइव्ह स्टँडन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट खऱ्या आयुष्यावर आधारित आहे.

'हिंदी मीडियम' : दिवंगत बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा सुपरहिट चित्रपट 'हिंदी मीडियम'च्या नावाला हिंदी हा शब्द जोडण्यात आला आहे. या चित्रपटाची कहाणी दिल्लीत राहणारा उद्योगपती राज बत्राची आहे, जो श्रीमंत आहे पण त्याला इंग्रजी बोलता येत नाही, त्यामुळे त्याच्या मुलीनं इंग्रजी शाळेत शिकावे अशी त्याची इच्छा असते. त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. या चित्रपटामध्ये इरफान खान व्यतिरिक्त सबा कमर, दीपक डोबरियाल, तिलोत्तमा शोम, दिशिता सहगल, अमृता सिंग, क्रिशन कुमार, संजय सूरी, संजना सांघी, राजेश शर्मा, नीलू कोहली आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन साकेत चौधरी यांनी केलं आहे. हा चित्रपट 19 मे 2019 रिलीज झाला.

'इंग्लिश विंग्लिश' : 2012 रोजी गौरी शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या दिवंगत अभिनेत्री श्री देवी यांच्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटाचे नावही या यादीत सामील आहे. या चित्रपटात श्रीदेवीनं शशीची भूमिका साकारली होती, जिला इंग्रजी येत नाही. अशा परिस्थितीत शशी म्हणजेच श्रीदेवीला इंग्रजीचे ज्ञान नसल्यामुळे वारंवार अपमानित होत असते. या चित्रपटात असा संदेश दिला गेला आहे की, आपण इंग्रजीला देशात खूप श्रेष्ठ बनवलं आहे आणि हिंदी भाषिकांना कमी समजत आहे. बॉलिवूडमध्ये हिंदी भाषेचे महत्त्व पहिल्यापासूनच समजावून सांगितले जात आहे.

'गोलमाल' : 1979 मध्ये आलेल्या 'गोलमाल' या चित्रपटात अमोल पालेकर हे मुख्य भूमिकेत दिसले. या चित्रपटातही हिंदीची दुर्दशा आणि महत्त्व अतिशय सुंदर पद्धतीनं मांडण्यात आले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केलंय. 'गोलमाल ' हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमोल पालेकर शिवाय उत्पल दत्त, अमिताभ बच्चन, बिंदीया गोस्वामी आणि देवेन वर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 20 एप्रिल, 1979 रिलीज झाला होता.

'चुपके चुपके' : धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन स्टारर लोकप्रिय चित्रपट 'चुपके-चुपके'चं नावही या यादीत सामील आहे. हा चित्रपट 1975 रोजी रिलीज झाला. या चित्रपटामध्ये धर्मेंद्रनं शुद्ध हिंदीत संवाद केला आणि त्याचा अभिनय या चित्रपटामध्ये अनेकांना आवडला. 'चुपके चुपके'मध्ये धर्मेंद्र, अमिताभ बच्चन व्यतिरिक्त शर्मिला टागोर, जया बच्चन, ओम प्रकाश, उषा किरण, डेव्हिड अब्राहम चेउलकर, असरानी आणि केश्तो मुखर्जी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 17'मध्ये विक्की जैनवर नॉमिनेशननंतर भडकली मन्नारा चोप्रा
  2. हृतिक रोशन वाढदिवस : बॉलिवूडच्या ग्रीक गॉडकडे आहेत दोन अ‍ॅक्शनर्स आणि एक सुपरहिरो फ्रँचायझी चित्रपट
  3. फराह खाननं वाढदिवसानिमित्त शेअर केला एक सुंदर व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.