ETV Bharat / entertainment

Hema Malini 75th birthday : हेमा मालिनींच्या 75 व्या वाढदिवसाला सेलेब्रिटी स्टार्सची मांदियाळी - सलमान खान

Hema Malini 75th birthday : हिंंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री हेमा मालिनी यांनी 16 ऑक्टोबर रोजी त्यांचा 75वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी त्यांच्यासाठी कुटुंबियांनी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत जय बच्चन, रेखा, सलमान खानसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.

Hema Malini 75th birthday
हेमा मालिनी यांचा 75वा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 10:24 AM IST

मुंबई - Hema Malini 75th birthday : दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांनी 16 ऑक्टोबर रोजी आपला 75वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी, हेमा यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी एका खास पार्टीचे आयोजित केले होते. या पार्टीमध्ये इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आले होते. यावेळी रेखा, जया बच्चन, जॅकी श्रॉफ, विद्या बालन, सलमान खान, राणी मुखर्जी, शिल्पा शेट्टी यांच्यासह अनेक स्टार्सनं पार्टीला हजेरी लावली होती. दरम्यान आता या पार्टीमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. याशिवाय हेमा मालिनी यांचा आपल्या कुटुंबासोबत केक कापतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

हेमा मालिनींचा लूक : 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी वाढदिवसाच्या पार्टीसाठी पीच शिमर साडी नेसली होती. यावर त्यांनी लाईट मेकअप केला होता. याशिवाय त्यांनी सुंदर नेकलेस आणि इयरिंग घातले होते. लूकला आणखी खास बनविण्यासाठी त्यांनी केस मोकळे ठेवले होते. यावेळी त्या खूपच सुंदर दिसत होत्या. हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलही पार्टीत गोल्डन कलरच्या गाऊनमध्ये खूपच हॉट दिसत होती. पत्नीच्या वाढदिवसाच्या पार्टीत धर्मेंद्रही सूटमध्ये दिसले. पार्टीतील हेमा मालिनी यांच्या केक कटिंगच्या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आणि दोन मुलींसोबत त्या केक कापताना दिसत आहे.

सलमान खान : हेमा मालिनी यांचा ऑन-स्क्रीन मुलगा सलमाननं आपल्या दमदार लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ब्लॅक लूकमध्ये भाईजान सुंदर दिसत होता.

जया बच्चन : हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत जया बच्चननं आपल्या लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. क्रीम कलरच्या आउटफिटमध्ये त्या खूप खास दिसत होत्या. यावेळी त्यांनी ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला होता. यावर त्यांनी मोत्याचा हार आणि गजरा घालून लूक पूर्ण केला होता.

रेखा आणि विद्या बालन : सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी ऑफ व्हाईट कलर साडीत नेसली होती. पार्टीमध्ये रेखा या विद्या बालनसोबत दिल्या. यावेळी त्यांनी रेड कार्पेटवर पोझ दिली. याशिवाय विद्या बालननं नेव्ही ब्लू साडी परिधान केली होती. या साडीमध्ये विद्या खूपच छान दिसत होती.

रेड कार्पेटवर उतरले स्टार्स : माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी तिची आई आणि बहीण अस्मिता शेट्टीसोबत बर्थडे पार्टीत पोहोचल्या होत्या. यावेळी शिल्पा शेट्टीनं पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि तिच्या बहीणनं पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. याशिवाय शिल्पाच्या आईनं लाल साडी नेसली होती. दुसरीकडे, माधुरीनं गुलाबी रंगाच्या ग्लिटर साडीत सर्वांची मनं जिंकली. या पार्टीत राणी मुखर्जीही स्काय कलरच्या ग्लिटर साडीत दिसली.

हेही वाचा :

  1. Leo Movie : विजय थलपथीला सुपरस्टार रजनीकांतनं दिल्या 'लिओ' चित्रपटासाठी शुभेच्छा...
  2. Hema Malini 75th birthday: ईशा देओलनं आई हेमा मालिनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; फोटोही केले शेअर...
  3. Saif Kareena Wedding Anniversary: करीना कपूरनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस, शेअर केला पतीसोबतचा 'हा' खास फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.