ETV Bharat / entertainment

Thalaivar 170 : 'थलैवर 170'मध्ये दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि रजनीकांत 33 वर्षांनंतर दिसणार एकत्र...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 2:57 PM IST

Thalaivar 170 : रजनीकांतचा आगामी चित्रपट 'थलैवर 170'मध्ये दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन दिसणार आहे. 33 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Thalaivar 170
थलैवर 170

मुंबई - Thalaivar 170 : सुपरस्टार रजनीकांतचा शेवटचा रिलीज झालेल्या 'जेलर'नं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटानं 600 कोटींहून अधिक कमाई केली असून आता 'थलैवर 170'साठी चाहते उत्सुक आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेल्या 'थलैवर 170'चे शूटिंग नुकतेच केरळमध्ये सुरू झालंय. 'थलैवर 170' चित्रपटामध्ये 33 वर्षांनंतर रजनीकांत अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत. 'थलैवर 170'च्या सेटवरील रजनीकांतनं अमिताभ बच्चन सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांचाही बॉन्ड खूप खास दिसत आहे.

रजनीकांतची सोशल मीडिया पोस्ट : रजनीकांत यांनी 'एक्स'वर फोटो शेअर करत लिहिलं, '33 वर्षांनंतर... मी पुन्हा एकदा माझे गुरू, अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'थलैवर 170' मध्ये काम करणार आहे. लायका प्रॉडक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल करणार आहेत. माझे मन आनंदाने उड्या मारत आहे'. या पोस्टवर अनेकांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त, चित्रपटात राणा दग्गुबती, अर्जुन सर्जा फहद फासिल, रितिका सिंग, मंजू वॉरियर यांच्यासह आणखी काही कलाकार दिसणार आहेत. 'थलैवर 170'चं संगीत अनिरुद्ध रविचंदरनं दिलं आहे. यापूर्वी त्यानं रजनीकांत स्टारर 'जेलर' आणि शाहरुख खान स्टारर 'जवान' या चित्रपटांसाठी संगीत दिलं होतं.

'थलैवर 170'बद्दल : मिळालेल्या माहितीनुसार, 'थलैवर 170' हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनेपासून प्रेरित आहे. यामध्ये रजनीकांत एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी रजनीकांतनं नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर' या अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपटात काम केलं होतं. दरम्यान पुढं ते ऐश्वर्या रजनीकांत लिखित आणि दिग्दर्शित लायका प्रॉडक्शन अंतर्गत सुबास्करन अल्लिराजा निर्मित, 'लाल सलाम'मध्ये एक छोटीशी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत हे प्रमुख भूमिकेत आहेत. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी 'अंधा कानून', 'गिरफ्तार' आणि 'हम' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. Pooja Hegde shares Love on a plate : पूजा हेगडेच्या ताटात आईनं वाढलं प्रेम, साजरा झाला खास दिवस
  2. Ranbir kapoor : टॉक्सिक पुरुष म्हणून ट्रोल करणाऱ्यांना रणबीर कपूरनं दिलं संयमानं उत्तर
  3. Shraddha Kapoor bought Lamborghini : दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धा कपूरनं स्वतःला दिली लाल रंगाची लॅम्बोर्गिनी भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.