मुंबई - S. S. Rajamouli Birthday : आरआरआर (RRR) आणि 'बाहुबली' सारखे उत्कृष्ट चित्रपट देणार दिग्दर्शक एस. एस. राजामौलीचा आज आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याची गणना देशातील दिग्गज दिग्दर्शकांमध्ये केली जाते. त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. 10 ऑक्टोबर 1973 रोजी जन्मलेल्या एस.एस. राजामौलीबद्दल अनेकजणांना काही गोष्टी माहित नाही. आज आम्ही तुम्हाला या खास दिवशी त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत.
करिअरची सुरुवात अशी झाली : एसएस राजामौलीला लहानपणापासूनच चित्रपटाचे ज्ञान मिळवण्याची ओढ होती. त्याचे वडील हे साऊथ पटकथा लेखक विजयेंद्र प्रसाद असून त्यांनी अनेक कहाण्या लिहल्या आहेत. राजामौली यांनी आपल्या करिअरची सुरुवात ईटीव्ही तेलगूच्या एका शोमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. राजामौली यांनी 2001 मध्ये छोट्या पडद्याला अलविदा करून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. राजामौली याचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘स्टूडेंट नंबर 1’ होता. त्यांचा हा पहिलाच चित्रपट ज्युनियर एनटीआरसोबतचा हिट ठरला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
घटस्फोटित महिलेशी केलं लग्न : राजामौली यांनी 2001 मध्ये मोठ्या पडद्यावर आपला प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यानं त्याच वर्षी रमा राजामौली यांच्याशी विवाह केला. रमा राजामौली या घटस्फोटित होत्या. याशिवाय त्यांना मुलगा देखील होता. राजामौली आणि रमा एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. राजामौली यांनी रमा यांना त्यांच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी खूप मदत केली होती. त्यानंतर काही काळानंतर त्यानं रमाला यांना लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर या जोडप्यानं अत्यंत साध्या पद्धतीनं कोर्ट मॅरेज केले होते. राजामौली यांचे पूर्ण नाव श्रीशैलम श्री राजामौली आहे. राजामौली यांना बाहुबलीनंतर संपूर्ण देश ओळखू लागला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. याशिवाय राजामौली याचा आरआरआर हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटामधील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर अवार्ड मिळाला आहे.
हेही वाचा :