मुंबई - भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरा यांचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. खरंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केले आहे. या व्हिडिओतील आशय पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य फुलल्या शिवाय राहणार नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हरभजनने पोस्ट केलेला व्हिडिओ हिंदीमध्ये आहे. तो आपली पत्नी गीता बसरासोबत रोमँटिक गप्पा मारताना दिसतो. हरभजन म्हणतो, ''आपल्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत... यावर त्याची गीता बासरा पत्नी लाजते व म्हणते हां जी..हरभजन म्हणतो: मी हे विचारतो होतो की दुसऱ्यांदा निवडणूका होणार की हेच सरकार पुढे सुरू ठेवायचे.'' त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मेरी सरकार. शादी के साईड इफेक्ट्स पार्ट ३."
हरभजनच्या या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे एक लाख लाईक्स आले आहेत. त्याचे चाहते हा व्हिडिओ शेअर करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा वर्षावच झालेला दिसतो.
हरभजन आणि गीता बसरायांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. गीता आणि हरभजन यांनी २९ ऑक्टोबर २०१५ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांचा सुखाचा संसार सुरू असून त्यांना दोन अपत्ये आहेत. २०१६ मध्ये त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. त्यांनी तिचे नाव हिनाया असे ठेवले आहे. गेल्या वर्षी हरभजन गीता यांना मुलगा झाला होता.
हेही वाचा - प्रियंका चोप्राने मुलगी आणि वडिलांसोबतचे फोटो शेअर करत साजरा केला डॉटर्स डे