ETV Bharat / entertainment

Happy birthday Prachi Desai : प्राची देसाईनं चित्रपटसृष्टीत कसं यश मिळवलं, जाणून घ्या तिचा आजवरचा प्रवास - प्राची देसाईचा वाढदिवस

Happy birthday Prachi Desai : प्राची देसाईचा आज वाढदिवस आहे. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत फार कमी वयात ओळख निर्माण केली. तिच्या वाढदिवसनिमित्यानं जाणून घ्या काही खास गोष्टी...

Happy birthday Prachi Desai
प्राची देसाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 7:28 PM IST

मुंबई - Happy birthday Prachi Desai : प्राची देसाई आज आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. 12 सप्टेंबर 1988 रोजी गुजरातमधील सुरत येथे जन्मलेल्या प्राची देसाईला कोणत्याही ओळखीची गरज नाही. प्राचीला लहानपणापासूनच अभिनयाच्या जगात स्थान मिळवायचं होतं. यामुळं तिनं आपलं लक्ष पूर्ण अभिनयावर केंद्रीत केलं. प्राचीनं आपल्या अभिनयाची सुरुवात मालिकांमधून केली. तिनं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या प्राची मनोरंजन विश्वापासून दूर असली, तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधताना दिसते.

या शोद्वारे टीव्हीच्या जगात प्रवेश केला : प्राची देसाईनं 'कसम से' या मालिकेत काम करून टीव्हीच्या दुनियेत पहिलं पाऊल ठेवलं, त्यावेळी ती फक्त 17 वर्षांची होती. या मालिकेनेच प्राचीला घराघरात प्रसिद्ध केलं. तीन वर्षांनंतर जेव्हा हा शो संपला तेव्हा प्राचीला अनेक ऑफर्स मिळाल्या. ती टीव्ही जगतात चांगली प्रसिद्धी मिळविली. 'झलक दिखला जा 2' या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्येही तिनं सहभाग घेतला. त्यानंतर ती या शोची विजेती ठरली. याशिवाय ती 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतही दिसली होती. प्राची देसाईचं शालेय शिक्षण सातारा जिल्ह्यातील पाचगणी तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले.

पहिल्याच चित्रपटात धमाका केला : प्राची जेव्हा 'कसम से' या मालिकेत काम करत होती, तेव्हा तिला 'रॉक ऑन' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 2008 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला, यामुळे प्राचीच्या करिअरला चालना मिळाली. या चित्रपटांतूनही तिनं आपली प्रतिभा दाखवली. प्राचीनं अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आत्तापर्यंत तिनं लाइफ पार्टनर, तेरी मेरी कहानी, रॉक ऑन 2, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, कार्बन, अझहर, एक विलेन आणि बोल बच्चन अशा चित्रपटामध्ये काम केलं आहे. अलीकडेच तिनं 'फॉरेन्सिक' या चित्रपटाद्वारे ओटीटीवर पदार्पण केले आहे.

या विवाहित दिग्दर्शकाशी संबंध होते : प्राची देसाईचं नाव बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या रोहित शेट्टीसोबत जोडलं गेलं असल्याची चर्चा होती. जेव्हा दोघेही रिलेशनशिपमध्ये आले, तेव्हा रोहित शेट्टीचं लग्न झालं होतं. एक वेळ अशी आली, जेव्हा रोहित हा त्याची पत्नी माया शेट्टी आणि मुलांना सोडण्यास तयार होता. मात्र, काही काळानंतर रोहित त्याच्या कुटुंबात परतला. त्याचं आणि प्राचीचं नातं तुटलं.

हेही वाचा :

  1. The great indian family trailer out : 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ...
  2. Welcome to the Jungle Controversy: अक्षय कुमार स्टारर 'वेलकम 3'चं शूटिंग झालं बंद ; जाणून घ्या कारण...
  3. Ayushmann khurrana : आयुष्मान खुरानानं व्यक्त केली 'ही' इच्छा ; जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.