ETV Bharat / entertainment

Gulshan Devaiah birthday : गुलशन देवय्याने माजी पत्नी कल्लीरोई झियाफेटासोबत साजरा केला वाढदिवस

गुलशन देवैया आणि कल्लीरोई झियाफेटा यांचा २०२० मध्ये घटस्फोट झाला असूनही ते जवळचे मित्र राहिले आहेत. गुलशनने त्याचा 45 वा वाढदिवस तिच्यासोबत साजरा केला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Gulshan Devaiah birthday
गुलशन देवैया आणि कल्लीरोई झियाफेटा
author img

By

Published : May 30, 2023, 3:27 PM IST

मुंबई - अभिनेता गुलशन देवय्याने रविवार 28 मे रोजी 45 वा वाढदिवस साजरा केला. त्याने त्याच्या वाढदिवसाचे फोटो इंस्टाग्रामवर माजी पत्नी कल्लीरोई झियाफेटासोबत शेअर केले आहेत. गुलशन अलीकडेच दहाड या गाजलेल्या लेब सिरीजमध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने सोनाक्षी सिन्हा आणि विजय वर्मा यांच्यासोबत काम केले आहे.

गुलशन देवय्याने इंस्टाग्रामवर त्याची माजी पत्नी, कल्लीरोई झियाफेटा सोबतचे स्वतःचे फोटो तसेच त्यांना खास दिवशी मिळालेल्या वाढदिवसाच्या भेटवस्तू पकडतानाचे फोटो शेअर केले. 'कालचा दिवस खूप छान आणि आरामदायी गेला. तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे आभार'. असे त्याने लिहिलंय.

अभिनेता विजय वर्मा, राधिका आपटे, सिकंदर खेर आणि मुक्ती मोहन यांच्यासह गुलशन देवय्याच्या चित्रपट व्यवसायातील अनेक मित्रांनी त्याला वाढदिवसानिमित्य शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या पोस्टवर कमेंट केली. गुलशन देवय्याचे त्याची माजी पत्नी कालीसोबत चांगला जमते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, गुलशनने माजी पत्नी कल्लीरोईसोबतच्या त्याच्या नातेसंबंधासह त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला होता.

एका मीडिया आउटलेटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आमच्यात काहीही बिघडले नाही हे निश्चित केल्याबद्दल मला माझी माजी पत्नी कल्लीरोईचे आभार मानायचे आहेत. आम्ही स्वतःला आदर्श म्हणून पाहिले नाही. कारण माझे अनेक मित्र आहेत जे त्यांच्या माजी व्यक्तीचा केवळ उल्लेख सहन करू शकत नाहीत.'

अभिनेता गुलशन देवय्याची रीमा कागती आणि झोया अख्तरच्या दहाडमध्ये उत्तम भूमिका होती. 22 फेब्रुवारी 2023 रोजी, जर्मनीतील 73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दहाड मालिकेचा प्रीमियर झाला होता. 12 मे 2023 रोजी ही मालिका प्राइम व्हिडिओवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुशलन अलिकडेच सैयामी खेरसोबत 8 AM मेट्रोमध्ये देखील दिसला होता. गुलशन देवैयाचा पुढचा चित्रपट गन्स अँड गुलाब्स असेल, ज्यामध्ये तो राजकुमार राव, दुल्कर सलमान आणि आदर्श गौरव यांच्यासोबत सहकलाकार असेल.

हेही वाचा - Kareena Kapoor :विमानतळावर नो मेकअप लूकमध्ये झक्कास दिसली करीना कपूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.