मुंबई - AR Rahman on suicidel thoughts : ए.आर. रहमान फिल्म इंडस्ट्रीतील एक महान संगीतकार आणि गायक आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. खडतर संघर्षानंतर आज आपल्या दमदार आवाजानं आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतानं त्यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. ए.आर. रहमान हे संगीतच नव्हे तर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलताना दिसतात. रहमान हे ऑक्सफर्ड युनियन डिबेटिंग सोसायटीमध्ये गेले होते, जिथे त्यांनी आपल्या जीवनातील कटू अनुभव आणि त्याच्या अनेक पैलूंवर विद्यार्थ्यांशी खुलेपणाने संवाद साधला.
रहमान यांनी आपल्या आयुष्याबद्दल, नातेसंबंधांबद्दल आणि करिअरबद्दल अनेक गोष्टी विद्यार्थ्यांशी शेअर केल्या. संभाषणादरम्यान, त्यांनी सांगितलं की, ''जेव्हा माझी खूप वाईट परिस्थितीत होती. त्यावेळी माझ्यासाठी अनेक गोष्टी या आव्हानात्मक होत्या.'' पुढं त्यांनी म्हटलं, ''प्रत्येकाच्या आयुष्यात जेव्हा काळोख येतो तेव्हा ते त्यातून बाहेर पडू शकतात.'' माझ्या आयुष्याला आकार देण्याचे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आणि अशा प्रसंगांना कसे हाताळायचे हे शिकवण्याचे श्रेय मी माझ्या आईला देतो. '' याशिवाय यावेळी एआर रहमान यांनी वाईट काळात आत्महत्येच्या विचारातून कशी मुक्तता केली याबद्दल देखील सांगितलं.
रहमान यांना त्यांच्या आई दिला सल्ला : विद्यार्थ्यांशी बोलताना एआर रहमान पुढं म्हटलं, ''मी लहान होतो तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे, त्यावेळी माझी आई म्हणायची की, जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगाल तेव्हा तुमच्या मनात हे विचार येणार नाहीत. माझ्या आईकडून मला मिळालेला हा सर्वात सुंदर सल्ला आहे. तिने आम्हाला इतरांसाठी जगण्याचे महत्त्व सांगितले, हा धडा मी माझ्या आईकडून शिकलो.'' रहमान यांनी पुढं सांगितलं, ''जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगता तेव्हा तुम्ही स्वार्थी नसता, तेव्हा तुमच्या आयुष्याला एक अर्थ असतो आणि मी ते खूप गांभीर्याने घेतले आहे.'' रहमान यांनी नुकताच त्यांचा वाढदिवस 6 जानेवारी साजरा केला. दरम्यान, रहमान यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर स्टारर हिंदी चित्रपट 'पिप्पा'साठी संगीत दिलं होतं.
हेही वाचा :