ETV Bharat / entertainment

Govinda Dance with Isha : गोविंदाची स्वप्नपूर्ती, 'ड्रीम गर्ल'च्या मुलीसोबत केला डान्स

author img

By

Published : May 5, 2022, 11:27 AM IST

गोविंदाने ( Govinda ) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ गुरुवारी सकाळी 9.30 वाजता शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये गोविंदा हिंदी सिनेसृष्टीची ड्रीम गर्ल हेमा मालिनीची मुलगी ईशा देओलसोबत ( Hema Malini Daughter Esha deol ) डान्स करताना दिसत आहे.

गोविंदाची स्वप्नपूर्ती
गोविंदाची स्वप्नपूर्ती

मुंबई - 80 आणि 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांची मने जिंकणारा 'हिरो नंबर-1' गोविंदा ( Heero No. 1 Govinda ) आज भलेही चित्रपटांमध्ये दिसत नसेल, पण त्याचे चाहते आजही कमी झालेले नाहीत. गोविंदा सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहतो आणि त्यांच्यासोबत डान्स आणि स्टाइलचे फोटो शेअर करत असतो. आता गोविंदाने सोशल मीडियावर सांगितले आहे की, त्याचे मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे.

गोविंदाने ( Govinda ) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ गुरुवारी सकाळी 9.30 वाजता शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये गोविंदा हिंदी सिनेसृष्टीची ड्रीम गर्ल हेमा मालिनीची मुलगी ईशा देओलसोबत ( Hema Malini Daughter Esha deol ) डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये गोविंदा आणि ईशा 'आप के आ जाने से' या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये गोविंदा आणि ईशाचा कॅज्युअल लूक परफेक्ट दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत गोविंदाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ' ड्रीम गर्लची मुलगी ईशा देओलसोबत डान्स करण्याचे स्वप्न पूर्ण झाले, द धूम गर्ल'. त्याचबरोबर हा व्हिडिओ ईशा देओलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना ईशाने लिहिले की, ''हिरो नंबर वन, तुमच्यासोबत डान्स करताना खूप मजा आली.'' आजकाल गोविंदा फक्त टीव्ही रिअॅलिटी डान्स शोमध्ये दिसतो.

ईशा शेवटची अजय देवगणच्या 'रुद्र - द एज ऑफ डार्कनेस' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. यापूर्वी ती 'एक दुआ' (2021) चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा - Koffee With Karan : 'कॉफी विथ करण' टीव्हीवर नाही, पण ओटीटीवर होणार प्रसारित, करण जोहरचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.