मुंबई : अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर 'घूमर' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला समीक्षककांडून खूप चांगले प्रतिसाद मिळाला आहेत. त्याचबरोबर सर्व सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. 'घूमर'ला 'गदर २' आणि 'ओएमजी २' या दोन मोठ्या चित्रपटांमधून बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर मिळाली आहे. 'घूमर' या चित्रपटाद्वारे अभिषेक बच्चन खूप दिवसानंतर रुपेरी पडद्यावर झळकला आहे. यापूर्वी अभिषेकने अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. 'घूमर'बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. याशिवाय 'गदर २' सुरू असताना हा चित्रपट रिलीज करण्यात आला. त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी कमी प्रेक्षक जात आहेत. दरम्यान आता प्रेक्षकांनी 'घूमर'ला किती प्रतिसाद दिला हे आपण पाहूया...
'घूमर'ने पहिल्या दिवशी किती केली कमाई : अभिषेक बच्चनच्या 'घूमर'ला चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. पण हा चित्रपट सनी देओलच्या 'गदर २' समोर टिकू शकलेला नाही. 'घूमर' बघण्यासाठी खूप कमी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जात आहेत. 'घूमर'ची सुरुवातीची आकडेवारी खूप निराशाजनक आहे. 'घूमर'ची अशी आकडेवारी पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काळ टिकून राहणार नाही असे चित्र दिसत आहे. सॅकनिल्क रिपोर्टनुसार, 'घूमर' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त ०.८५ लाख रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप वाईटरित्या फ्लॉप होऊ शकतो असे सध्या दिसत आहे.
'गदर २'समोर 'घूमर' टिकणे कठीण : सध्या 'गदर २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर अक्षयच्या 'ओएमजी २' या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, दरम्यान अशा परिस्थितीत 'घूमर' चित्रपटाला या दोघांसमोर टिकणे अशक्य झाले आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई याचा पुरावा आहे की, हा चित्रपट फ्लॉप होईल. 'घूमर'चा लवकरच रुपेरी पडद्यावरून टाटा बाय बाय होऊ शकतो. 'घूमर' या चित्रपटाची कहाणी अपघातात हात गमावलेल्या क्रिकेटरच्या प्रेरणादायी कथेवर आधारित आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सैयामी खेर व्यतिरिक्त शबाना आझमी आणि अंगद बेदी महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.
हेही वाचा :