ETV Bharat / entertainment

Goodbye trailer: रश्मिका मंदान्नाच्या बॉलीवूड पदार्पण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज - रश्मिका मंदाना हिंदी चित्रपट

गुडबाय चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी ट्रेलर रिलीज केला. या चित्रपटातून रश्मिका मंदान्ना बॉलिवूड डेब्यू करत आहे. विकास बहल दिग्दर्शित, गुडबाय हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

गुडबाय ट्रेलर रिलीज
गुडबाय ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Sep 6, 2022, 5:29 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका असलेला आगामी कौटुंबिक मनोरंजन चित्रपट गुडबायचे निर्माते यांनी मंगळवारी चित्रपटाच्या ट्रेलरचा लॉन्च केला. गुडबाय ट्रेलर पाहता हा चित्रपट जीवन, कुटुंब आणि नातेसंबंधांबद्दल हृदयस्पर्शी कथा उलगडताना दिसणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका बॉलीवूड पदार्पण करत आहे, जो 7 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. विकास बहल दिग्दर्शित, या चित्रपटात नीना गुप्ता आणि पावेल गुलाटी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एली अवराम, सुनील ग्रोव्हर आणि साहिल मेहता देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.

दरम्यान, रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनूमध्ये आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या पुढील अॅनिमलमध्ये रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. दुसरीकडे अमिताभ बच्चन हे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या पुढच्या कौटुंबिक मनोरंजन चित्रपट उंचाईमध्ये अनुपम खेर, परिणीती चोप्रा आणि बोमन इराणी यांच्यासोबत दिसणार आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा - ललित मोदी आणि सुष्मिता सेनचे ब्रेकअप?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.