ETV Bharat / entertainment

Golden Globes 2023: आरआरआर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन इंग्रजी पुरस्काराची हुलकावणी - नॉन इंग्रजी पुरस्काराची हुलकावणी

चित्रपट निर्माते एस एस राजामौली यांच्या उत्कृष्ट रचना असलेल्या आरआरआर चित्रपटाने गोल्डन ग्लोब सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्कार गमवला आहे. आरआरआरवर मात करत अर्जेंटिना 1985 ला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्कार मिळाला. आरआरआर चित्रपटाला मूळ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. यावरच समाधान मानावे लागले.

आरआरआर
आरआरआर
author img

By

Published : Jan 11, 2023, 10:53 AM IST

लॉस एंजेलिस - एस एल राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाने मूळ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब मिळवला, मात्र सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्कार हातातून निसटला. आरआरआरवर मात करत अर्जेंटिना 1985 ला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्कार मिळाला. आरआरआर हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट होता. या वर्षी गोल्डन ग्लोब्समध्ये या चित्रपटाकडून मोठ्या आशा बाळगल्या जात होत्या. मात्र चित्रपटाची टीम आणि संपूर्ण भारतवासीयांना एका डोळ्या हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसूचा अनुभव आला. आरआरआरमधील नाटू नाटू गाण्याला मूळ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला मात्र सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्काराने यशापासून हुलकावणी दिली.

आरआरआर या चित्रपटाला कोरियन रोमँटिक मिस्ट्री डिसीजन टू लीव्ह, जर्मन अँटी वॉर ड्रामा ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ऐतिहासिक नाट्य असलेला अर्जेंटिना, 1985 आणि फ्रेंच-डच कमिंग-ऑफ-एज ड्रामा क्लोज द नॉन-इंग्रजी श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते. आरआरआर चित्रपटाने जगभरात 1,200 कोटींहून अधिक (अंदाजे) बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केल्याने ती एक आंतरराष्ट्रीय घटना बनली होती. या चित्रपटात राम चरण आणि जूनियर NTR यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

अर्जेंटिनासाठी, 1985, हा चित्रपट 1985 च्या ट्रायल ऑफ द जंटासच्या आजूबाजूच्या वास्तविक घटनांवर आधारित आहे, ज्याने अर्जेंटिनाच्या शेवटच्या नागरी-लष्करी हुकूमशाहीच्या प्रमुखांवर खटला चालवला होता. हे अर्जेंटिनाच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित हुकूमशाहीसाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध वकील ज्युलिओ सेझर स्ट्रासेरा आणि लुईस मोरेनो ओकॅम्पो यांच्या नेतृत्वाखालील वकीलांच्या गटाच्या कार्यावर प्रकाश टाकते.

हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन 2020 मध्ये विविधतेचा अभाव आणि अनैतिक आर्थिक व्यवहारांसह वादांमुळे चर्चेत आल्यानंतर हा पहिला गोल्डन ग्लोब सोहळा होता. बेव्हरली हिल्स, कॅलिफोर्निया येथील बेव्हरली हिल्टन येथे आयोजित, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 भारतात लायन्सगेट प्लेवर प्रसारित होत आहेत.

आरआरआर टीम गोल्डन ग्लोबमध्ये सहभागी - आरआरआर चित्रपटाची टीम लॉस एंजेलिसमध्ये गोल्डन ग्लोबमध्ये त्यांच्या नावावर आणखी एक प्रतिष्ठित पुरस्कार जोडण्यासाठी सज्ज झाली होती. एसएस राजामौली, त्यांचे कुटुंबीय, राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना यांच्यासह आरआरआर टीम पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आहे.

आरआरआर चित्रपटाची ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड झाली नसली तरी, एसएस राजामौली यांच्या उत्कृष्ट रचनांच्या निर्मात्यांनी अकादमी पुरस्कार नामांकनासाठी ‘फॉर युवर कन्सिडरेशन’ मोहिमेत सामील होऊन आणखी एक संधी घेण्याचे ठरवले. सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (एसएस राजामौली), मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (राम चरण आणि जूनियर एनटीआर) आणि बरेच काही यासह 14 श्रेणींमध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट सबमिट केला गेला आहे.

गोल्डन ग्लोबच्या आधी यूएस मधील बियॉन्ड फेस्टचा भाग म्हणून 9 जानेवारी रोजी TCL चायनीज थिएटर्समध्ये आरआरआर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि संगीतकार एमएम कीरावानी स्क्रीनिंगला उपस्थित राहणार होते. TCL चायनीज थिएटर्स हे जगातील सर्वात मोठे IMAX थिएटर आहे. हा चित्रपट दुसऱ्यांदा धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आला. आरआरआर हा चित्रपट अंदाजे 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला गेला होता आणि त्याच्या थिएटर रन दरम्यान जगभरात 1200 कोटींहून अधिक कमाई केली होती. हा जागतिक स्तरावर प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लोकप्रिय नॉन-इंग्रजी चित्रपट आहे. तो नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक बनला.

आरआरआरमध्ये राम चरण, ज्युनियर NTR, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह इतर कलाकार आहेत. क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनाचे काल्पनिक वर्णन आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.