पणजी ( गोवा ) - तेराव्या मराठी चित्रपट महोत्सवाचे गोव्यात आयोजन करण्यात आले आहे. 5 ते 7ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवाचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठीतील सदाबहार अभिनेता अशोक सराफ यांचा कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अशोक सराफ यांच्या अनुपस्थित हा पुरस्कार त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी स्वीकारला. पाच ते सात ऑगस्ट चालणाऱ्या या मराठी चित्रपट महोत्सवात मराठीतील वीस अधिक चित्रपट दाखविले जाणार आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत , मृणाल कुलकर्णी, मोहन आगाशे, मिलिंद गुणाजी, पुष्कर श्रोत्री, निवेदिता सराफ व अन्य मराठी कलाकारांच्या उपस्थितीत करण्यात आले. या चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अशोक सराफ यांना कृतज्ञता पुरस्कार - यावेळी मराठीतील सदाबहार अभिनेते अशोक सराफ यांना त्याच्या चित्रपटातील कार्याबद्दल तेराव्या चित्रपट महोत्सवात कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या अनुपस्थित हा पुरस्कार त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी स्वीकारत आयोजकांचे आभार मानले.
प्लॅनेट मराठीचाही सत्कार - यावेळी प्लॅनेट मराठीच्या मृणाल कुलकर्णी तसेच पुष्कर श्रोत्री यांचाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात गोव्याबद्दलचं प्रेम व्यक्त करत असताना आम्ही अनेक चित्रपटांची संकल्पना, चित्रीकरण गोव्यात केल्याचं त्या म्हणाल्या.
अहिरे यांच्या काटेकोर पुस्तकाचं प्रकाशन - या चित्रपट महोत्सवात साठ हून अनेक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या काटेकोर या पुस्तकाचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी आपली भूमिका व्यक्त करत असताना गजेंद्र अहिरे म्हणाले ते हे पुस्तक तुमच्यासमोर देत असताना काळजात धडधड होत असून मी माझ्या कारकिर्दीत साठ पेक्षा अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे त्याचा चालता बोलता आलेख या पुस्तकात मांडल्याचं ते म्हणाले.
हेही वाचा - किम कार्दशियन आणि पीट डेव्हिडसन 9 महिन्यांच्या डेटिंगनंतर झाले विभक्त?