ETV Bharat / entertainment

लाईट्स, कॅमेरा.. अॅक्शन! जेनेलिया देशमुखने 'ट्रायल पीरियड'च्या शूटिंगला केली सुरुवात

author img

By

Published : May 27, 2022, 9:55 AM IST

अभिनेत्री जेनेलिया देशमुखने पुन्हा शुटिंगचा धुमधडाका लावला आहे. रितेश देशमुखसोबत 'मिस्टर मम्मी'चे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर तिने आता 'ट्रायल पीरियड' या नव्या प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे.

जेनेलिया देशमुख
जेनेलिया देशमुख

मुंबई - अभिनेत्री जेनेलिया देशमुख सध्या चर्चेत आली आहे. दीर्घकाळ रुपेरी पडद्यापासून लांब राहिल्यानंतर यावर्षी तिने पुन्हा शुटिंगचा धुमधडाका लावला आहे. रितेश देशमुखसोबत 'मिस्टर मम्मी'चे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर तिने आता 'ट्रायल पीरियड' या नव्या प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे.

शुक्रवारी जेनेलियाने इंस्टाग्राम स्टोरी वर तिच्या चाहत्यांसाठी याबाबतचे अपडेट शेअर केले. यामध्ये तिने शुटिंगला जात असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

क्लिपच्या बरोबरीने, तिने तिच्या वर्षातील "चौथ्या प्रोजेक्ट" च्या शूटिंगबद्दल उत्साह व्यक्त करणारी एक छोटी टीप लिहिली आहे. ''माझ्या मार्गावरील आणखी एक नवी सुरुवात. नवा चित्रपट 'ट्रायल पीरियड'. यावर्षीचा चौथा प्रोजेक्ट..फार मस्त वाटतंय'', असे तिने लिहिलंय.

'ट्रायल पीरियड'चे दिग्दर्शन आलिया सेन करत आहे. मानव कौल देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.

हेही वाचा - पंकज त्रिपाठीने केले लडाखमध्ये 'गुलकंदा टेल्स'चे शूटिंग, सांगितला खडतर अनुभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.