मुंबई - Gautami Tadimalla Resigns : गौतमी तडिमल्ला यांनी पार्टी सोडताना आरोप केला की, पक्षातील काही लोक विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा देत आहेत. त्या वयाच्या 17 व्या वर्षापासून भाजपा पार्टीसाठी काम करत होत्या. त्यांनी 37 वर्षे सिनेमा, टेलिव्हिजन, रेडिओ आणि डिजिटल मीडियामध्ये काम केलं आहे. सोशल मीडियात गौतमी तडिमल्ला यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि तामिळनाडू प्रमुख के. अन्नामलाई यांना टॅग केले.
-
A journey of 25 yrs comes to a conclusion today. My resignation letter. @JPNadda @annamalai_k @BJP4India @BJP4TamilNadu pic.twitter.com/NzHCkIzEfD
— Gautami Tadimalla (@gautamitads) October 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A journey of 25 yrs comes to a conclusion today. My resignation letter. @JPNadda @annamalai_k @BJP4India @BJP4TamilNadu pic.twitter.com/NzHCkIzEfD
— Gautami Tadimalla (@gautamitads) October 23, 2023A journey of 25 yrs comes to a conclusion today. My resignation letter. @JPNadda @annamalai_k @BJP4India @BJP4TamilNadu pic.twitter.com/NzHCkIzEfD
— Gautami Tadimalla (@gautamitads) October 23, 2023
25 वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश केला : अभिनेत्री तडिमल्ला यांनी लिहलं, 'अत्यंत जड अंतःकरणानं मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी 25 वर्षांपूर्वी पक्षाच्या राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी सामील झाले. माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांना तोंड दिले. तरीही आज मी माझ्या आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर उभी आहे, जिथे मला पक्ष आणि नेत्यांची साथ मिळत नाही. तर अनेकजण त्या विश्वासघातकी व्यक्तीला सक्रियपणे मदत करत आहे. माझा विश्वासघात कोणी केला? तडिमल्ला यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे पत्रात : पत्रात सांगितलं की, एका विशिष्ट व्यक्तीनं त्यांचे पैसे, मालमत्ता आणि कागदपत्रांची फसवणूक केली आहे. याशिवाय त्यांचा पार्टीमध्ये विश्वासघात केला, असं त्यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी कोणीही त्यांची साथ देत नाही आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. या फसवणुकीबद्दल पोलिसात तक्रार केली. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि न्यायालयीन यंत्रणा त्यांना न्याय मिळवून देतील अशी आशा आहे. गौतमी त्यांनी पुढे सांगितलं की, 2021 च्या निवडणुकीत राजापालयम मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. तिथून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येईल हेदेखील सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी खूप प्रयत्न केला. मात्र त्यानंतर निवडणूक लढवण्याचे हे आश्वासन रद्द करण्यात आले. असं असतानाही त्यांनी पक्षाशी बांधिलकी कायम ठेवली. त्यांनी संघटनेत 25 वर्षांच्या सेवेनंतरही पाठिंबा नसल्याची खंत व्यक्त केली आहे. फसवणूक करणाऱ्या भाजपा नेत्यांवर एफआयआर नोंदवली आहे. मात्र 40 दिवसांपासून हे सदस्य फरार असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. शेवटी त्यांनी सांगितलं की, अत्यंत वेदना आणि दुःखानं राजीनामा पत्र लिहित आहे.
हेही वाचा :