ETV Bharat / entertainment

गौहर खान, जैद दरबार यांनी व्हिडिओद्वारे शेअर केली गर्भधारणेची गुड न्यूज - गौहर आणि जैद दरबार

अभिनेत्री गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गौहर आणि जैद दरबार यांनी मंगळवारी इंस्टाग्रामवर तिच्या गरोदरपणाची बातमी एका अॅनिमेटेड रीलद्वारे शेअर केली.

गौहर खान, जैद दरबार
गौहर खान, जैद दरबार
author img

By

Published : Dec 21, 2022, 9:59 AM IST

मुंबई - अभिनेत्री गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार त्यांच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत आहेत. मंगळवारी, या जोडप्याने आपापल्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या चाहत्यांसाठी ही गुडन्यूज शेअर केली.

गौहर आणि जैद दरबार यांनी मंगळवारी इंस्टाग्रामवर तिच्या गरोदरपणाची बातमी एका अॅनिमेटेड रीलद्वारे शेअर केली. या जोडप्याने त्यांचे चाहते आणि अनुयायांकडून प्रेम आणि प्रार्थना मागितल्या.

"बिस्मिल्ला हिर रहमान नीर रहीम. तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि प्रार्थनांची गरज आहे. मा शा अल्ला," असे गौहरने लिहिले. तिने एका सुंदर अॅनिमेटेड व्हिडिओसह बातमी दिली. या व्हिडिओमध्ये असे लिहिले आहे की, "झेड जी ला भेटल्यावर एकाचे दोन झाले. आणि आता तीन होण्याचे साहस करत आहोत. या सुंदर प्रवासात तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादाची अपेक्षा करत आहोत.

या व्हिडिओनंतर मित्र, कुटुंब आणि चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये भरभरुन प्रतिसाद दिला आहे. "तुम्हा दोघांचे मोठे अभिनंदन! नजर ना लागे," असे अभिनेत्री कृती खरबंदा हिने कमेंट केली. "मला माहित आहे, मला अलीकडे तुमच्या पोस्ट्स पाहिल्याबद्दल माहित आहे, तुमच्यासाठी खूप आनंद झाला," अभिनेत्री किश्वर मर्चंटने लिहिले. "माशाल्लाह!! तुमचे अभिनंदन," असे अभिनेत्री सोफी चौधरीने कमेंटमध्ये लिहिलंय.

रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर, इशकजादे आणि राजकीय नाट्यमय मालिका तांडव यासारख्या कलाकृतीसाठी साठी प्रसिद्ध असलेली गौहर खान हिने प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबार याच्याशी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले. लॉकडाऊन दरम्यान किराणा सामान खरेदी करताना दोघे भेटले. दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

हेही वाचा - घरमालकाने केली होती घाणेरडी मागणी, तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.