मुंबई - Ganpath Teaser Release Date Postponed: आगामी थ्रिलर 'गणपथ : ए हिरो इज बॉर्न' चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी टीझर रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी बुधवारी हा टीझर रिलीज करण्याचं ठरलं होतं. परंतु निर्मात्यांनी या रिलीजची तारीख 29 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. बुधवारी एक नवं पोस्टर प्रदर्शित करत हा निर्णय त्यांनी चाहत्यांना कळवला आहे.
टायगर श्रॉफनं आपल्या इन्स्टाग्रामवर 'गणपथ'चे नवं पोस्टर शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हमसे मिलने के लिए करना होगा थोडा और इंतजार. क्यूँकी हम लेकर आ रहे है आपके लिए कुछ खास. गणपथचा टीझर 29 सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात येईल. हा चित्रपट दसऱ्याच्या निमित्तानं 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.'
या नव्या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ सहकलाकार क्रिती सेनॉनसोबत पोज देताना दिसतोय. विकास बहल दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'गणपथ : ए हिरो इज बॉर्न' हा डोळ्यांची पारणे फेडणारा साहसी चित्रपट हमखास मनोरंजनाची हमी देणारा असणार आहे. याची कथाही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असल्याचा दावा निर्मात्यांनी यापूर्वी केला आहे. एका अज्ञात क्षेत्रामध्ये आपल्या नसिबाचा शोध गेण्यासाठी निघालेल्या एका लढवय्या तरुणाची ही कथा रुेपरी पडद्यावर साकारली जाणार आहे.
गणपथ चित्रपटाच्या प्रमोशनचा प्लॅन तयार आहे. त्यानुसार चित्रपटाचं शीर्षक आणि कलाकार नेहमी चर्चेत कसे राहतील याची काळजी घेतली जात आहे. गणेश उत्सवाच्या काळात जय गणेशा हे गाणे रिलीज करण्यात आलं होतं. विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केलंलं गाणं त्यांनीच गायलं होतं.
20 ऑक्टोबर रोज प्रदर्शित होत असलेला गणपथा चित्रपट पूजा एंडरटेन्मेंटसोबत गुड कंपनीने सादर केला आहे. 'गणपथ : ए हिरो इज बॉर्न' चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत जगभरात प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे.
हेही वाचा -
1. Aamir Khan at Ganpati pooja: आमिर खाननं आशिष शेलारांच्या घरी केली गणपतीची पूजा