मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना लैंगिक छळ प्रकरणी मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एका महिला डान्सरने नृत्यदिग्दर्शकाविरुद्ध लैंगिक छळप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. हे प्रकरण फेब्रुवारी 2020 मधील आहे. पोलिसांनी गणेश आचार्यविरुद्ध अनेक कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते.
2010 मध्ये गणेश आचार्य यांच्या कार्यालयात भेटायला गेल्यावर तिला अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडले गेले आणि नाही म्हटल्याने त्रास दिला, असा आरोप महिलेने केला होता. एवढेच नाही तर सहा महिन्यांनंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनने त्यांचे सदस्यत्वही रद्द केले. यासोबतच महिला डान्सरनेही मारहाणीचा आरोप केला होता.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कोरिओग्राफरविरुद्ध कलम 354-ए, 354-सी, 354-डी आणि कलम 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. गणेश आचार्य यांना लैंगिक छळ प्रकरणात कधीही अटक करण्यात आली नव्हती.
हेेही वाचा - Shamshera Trailer: जमातीच्या स्वातंत्र्यासाठी अथकपणे लढणाऱ्या 'शमशेरा'चा भव्य ट्रेलर