ETV Bharat / entertainment

Ganapath Box Office Collection Day 4 : टायगर श्रॉफ स्टारर 'गणपथ' बॉक्स ऑफिसवर कमाईच्याबाबतीत ठरला अपयस्वी... - बॉक्स ऑफिस

Ganapath Box Office Collection Day 4 :'गणपथ: ए रियल हिरो इज बॉर्न' हा अ‍ॅक्शनपट चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे.

Ganapath Box Office Collection Day 4
गणपथ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 2:51 PM IST

मुंबई - Ganapath Box Office Collection Day 4 : टायगर श्रॉफचा अ‍ॅक्शन चित्रपट 'गणपथ: ए रियल हिरो इज बॉर्न' या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. टायगर 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे क्रिती सेनॉनसोबत दिसला आहे. सध्या ‘गणपथ’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खराब प्रतिसाद मिळाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. 'गणपथ'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी खूप कमी कमाई केली आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' चित्रपटात टायगर आणि क्रिती व्यतिरिक्त अमिताभ बच्चन देखील महत्त्वाची भूमिक्त आहे.

'गणपथ'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : टायगरला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र आता प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयस्वी ठरला आहे. वीकेंडकडून निर्मात्यांना खूप आशा होती, पण चित्रपटाच्या कमाईत कोणतीही वाढ झालेली नाही. 'गणपथ'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं या चित्रपटानं रिलीच्या पहिल्या दिवशी 2.50 कोटीची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 2.25 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 2.25 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 7 कोटी झाले आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या चौथ्या दिवसात आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा चित्रपट 1 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 8 कोटी होईल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'गणपथ' चित्रपटाबद्दल : 'गणपथ' हा चित्रपट 200 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. या चित्रपटाच्या कमाईत घट होत असल्यानं या सिनेमाला लागलेले पैसे वसूल होऊ शकणार नाही. हा चित्रपट फ्लॉप होईल असं सध्या दिसत आहे. 'गणपथ' हा चित्रपट पूजा एंटरटेनमेंटद्वारा बनविण्यात आला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी केली आहे. 'गणपथ'मध्ये टायगर आणि क्रितीचे जबरदस्त अ‍ॅक्शन सीन आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

  1. Tiger 3 Song Out : 'टायगर 3'च्या डान्स नंबरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफमध्ये दिसली जबरदस्त केमिस्ट्री...
  2. Gautami Tadimalla Resigns : २५ वर्षे भाजपाशी एकनिष्ठ असताना अभिनेत्री गौतमी यांनी दिला राजीनामा, पक्षाच्या नेत्यांवर 'हे' केले गंभीर आरोप
  3. Leo Box Office Collection Day 5: थलापथी विजयचा चित्रपट पाचव्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.