मुंबई - Ganapath Box Office Collection Day 3: अभिनेता टायगर श्रॉफच्या बहुप्रतीक्षित 'गणपथ - ए हिरो इज बॉर्न'' बॉक्स ऑफिसवर 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वी खूप चर्चा होती. 'गणपथ' चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये टायगर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन अॅक्शन मोडमध्ये दिसले आहेत. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन देखील या चित्रपटामध्ये महत्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरू शकतो, असा आधी अंदाज वर्तवला जात होता. 'गणपथ' चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीनुसार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ शकतो असं सध्या दिसत आहे.
'गणपथ - ए हिरो इज बॉर्न'चे कलेक्शन : टायगर श्रॉफ स्टारर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नाही असं सध्या दिसत आहे. रिपोर्टनुसार, 'गणपथ'नं पहिल्या दिवशी 2.50 कोटीची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 3 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 5.5 कोटी झालं आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या तिसऱ्या दिवसात आहे. हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 5 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 10.50 होईल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप मंद गतीनं कमाई करत आहे. 'गणपथ' चित्रपट 200 कोटीच्या बजेटमध्ये बनला आहे. 'गणपथ'च्या कमाईवरून चित्रपटाचे बजेट वसून होणं देखील अवघड दिसत आहे.
'गणपथ' चित्रपटाबद्दल : टायगर आणि क्रिती सेनॉन याआधी 'हीरोपंती' मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नहव्ती. 'गणपथ' चित्रपट पूजा एंटरटेनमेंटद्वारा बनविण्यात आला आहे. तसेच 'गणपथ'चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा :