ETV Bharat / entertainment

Gadar 2 Vs OMG 2 Collection Day 23 : 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'च्या कमाईत झाली घट... - ओएमजी 2

Gadar 2 Vs OMG 2 Collection Day 23 : 'गदर 2' आणि 'ओएमजी 2' हे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहेत. दरम्यान, आता या चित्रपटांच्या कमाईत घट झाली आहे. या चित्रपटांनी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Gadar 2 Vs OMG 2 Collection Day 23
गदर 2 आणि ओएमजी 2चे कलेक्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 11:45 AM IST

मुंबई - Gadar 2 Vs OMG 2 Collection Day 23: 'गदर 2' हा 2023 मधील बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट लवकरच 500 कोटीचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा केली जात आहे. 'गदर 2' 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. 'गदर 2'ला आता रिलीज होऊन 22 दिवस झाले आहेत. 'गदर 2' चित्रपट भारत आणि पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल व्यतिरिक्त उत्कर्ष शर्मा, सिमरन कौर आणि मनीष वाधवा यांच्यासह अनेक कलाकारांनी दमदार अभिनय केला.

'गदर 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : या चित्रपटाने भारताच नाही तर जगभरात देखील खूप कमाई केली आहे. दरम्यान आता 'गदर 2' रिलीजच्या 22व्या दिवशी कमी कमाई करत आहे. या चित्रपटाने 22व्या दिवशी 4.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाची एकूण कमाई 486.75 कोटी रुपये झाले आहे. 'गदर 2'ने दंगल, बाहुबली आणि इतर हिंदी सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. 'गदर 2' ने रिलीजच्या 21व्या दिवशी 8.10 कोटींचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट 23व्या 6.00 कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 492.75 होईल. तसेच 24व्या दिवशी म्हणजेच रविवारी हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे.

'ओएमजी 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : अक्षय कुमारचा सामाजिक संदेश देणारा चित्रपट 'ओएमजी 2'ने 21 दिवसांत 141.86 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'ओएमजी 2'ने आज म्हणजेच 22 व्या दिवशी चित्रपट 1.1 कोटी रुपये कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या 23व्या दिवशी 1.5 कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 144.42 कोटी होईल. हा चित्रपट 150 कोटीचा आकडा गाठण्यास काही पाऊले दूर आहे. जर अशीच कमाई 'ओएमजी 2'ने बॉक्स ऑफिसवर सुरू ठेवली तर 6 दिवसात हा चित्रपट 150 कोटीचा आकडा ओलांडेल. अक्षय कुमारला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे.

हेही वाचा :

  1. Vijay Varma schools paparazzi : मर्यादा ओलंडणाऱ्या पापाराझीचा विजय वर्माने घेतला क्लास, तमन्नानेही सांगितली खटकणारी गोष्ट
  2. Jawan advance booking : 'जवान'चा पहिल्या दिवशी पहिला शो पाहणार ८५ हजार चाहते; अ‍ॅडव्हान्स बुकिंगला अफाट प्रतिसाद
  3. Anurag Kashyap sensational disclosure : सलमानच्या चित्रपटासाठी हटवला गेला 'गँग्स ऑफ वासेपूर', अनुराग कश्यपचा सनसनाटी खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.