मुंबई : बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओलचा चित्रपट 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. अवघ्या 80 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 450 कोटींचा आकडा पार केला आहे. 'गदर 2' अजूनही सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. थिएटरमध्ये 'हिंदुस्तान झिंदाबाद'चा नारा अनेकजण देत आहेत. 'गदर 2' हा चित्रपट लवकरच 500 कोटीचे लक्ष्य गाठेल असे सध्या दिसत आहे. दरम्यान 'ओ माय गॉड 2' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर साधारण कमाई करत आहे. या चित्रपटाला 'गदर 2'सोबत खूप संघर्ष करावा लागला आहे. 'गदर 2' आणि 'ओ माय गॉड 2' चित्रपट १९व्या दिवशी किती कमाई करू शकेल हे जाणून घेऊया...
'गदर 2'चे कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार , 'गदर 2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 40.01 दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसऱ्या दिवशी 51.07 कोटी, चौथ्या दिवशी 38.07 कोटी, पाचव्या दिवशी 55. 04 कोटी, सहाव्या दिवशी 32.37 कोटी, सातव्या दिवशी 23.28 कोटी, आठव्या दिवशी 20.5 कोटी, नव्या दिवशी 31.07 कोटी, दहाव्या दिवशी 38.9 कोटी, अकराव्या दिवशी 13.5 कोटी, बाराव्या दिवशी 12.1 कोटी, तेराव्या दिवशी 10 कोटी, चौदाव्या दिवशी 8.4 कोटी, पंधराव्या दिवशी 7.1 कोटी, सोळाव्या दिवशी 13.75 कोटी, सतराव्या दिवशी 16.1 अठराव्या दिवशी 4.60 कोटींची कमाई केली. त्यानंतर हा चित्रपट एकोणीसव्या दिवशी 4.70 कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 465.35 होईल.
'ओ माय गॉड 2' चे कलेक्शन : अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'ओ माय गॉड 2'ने तिसर्या सोमवारी म्हणजेच रिलीजच्या 18 व्या दिवशी 1.20 कोटींची कमाई केली आहे. यासह या चित्रपाटचे एकूण कलेक्शन 137.12 कोटीवर पोहचले आहे. 'ओ माय गॉड 2' हा चित्रपट एकोणीसव्या दिवशी 1.50 कोटी कमाई करू शकेल. त्यानंतर या चित्रपटाने एकूण कलेक्शन 138.43 इतके होईल. 'ड्रीम गर्ल 2' आणि 'गदर 2'मुळे 'ओ माय गॉड 2'च्या कमाईवर परिणाम झाला आहे. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करतात हे पाहणे लक्षणीय ठरणार आहेत.
हेही वाचा :