मुंबई : सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' रिलीजपूर्वीच धुमाकूळ घालत आहे. 'गदर 2' बाबत सनीच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून आता बॉक्स ऑफिसवर 'त्सुनामी' येणार असल्याचे दिसते. 'गदर-एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या 22 वर्षांनंतर 'गदर 2' हा चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. याआधी, 'गदर 2' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत अभूतपूर्व कलेक्शन केले आहे. 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी मोठी कमाई करणार असल्याचे बोलले जात आहे. कारण चित्रपटाने एका दिवसात 70 हजारांहून अधिक अॅडव्हान्स बुकिंग केले आहे.
- एका दिवसात इतकी तिकिटे विकली : चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितले की, 'गदर 2' चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरूच आहे. नॅशनल चेन्समध्ये एका दिवसात सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत 76600 अॅडव्हान्स तिकिटांचे बुकिंग गदर-2 चित्रपटाने केले असून यामध्ये पीव्हीआरमध्ये 33 हजार, आयनॉक्समध्ये 25500 हजार आणि सिनेपोलिसमध्ये 18100 हजार तिकिटांचे बुकिंग झाले आहे.
- आकडा अजूनही वाढत आहे : त्याचवेळी आता मंगळवारपर्यंत (8 ऑगस्ट) अॅडव्हान्स तिकीट बुकिंगचा आकडा 83 हजारांवर गेला आहे, ज्यामध्ये पीव्हीआरमध्ये हा आकडा 33 वरून 36 हजार, INOX मध्ये 25 ते 28 हजार आणि 18 ते 19,300 वर गेला आहे.
अक्षय कुमारचा OMG 2 गदर 2 मध्ये टिकू शकणार नाही : 'गदर 2' 11 ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा चित्रपट 'OMG 2' देखील याच दिवशी प्रदर्शित होत आहे, परंतु 'गदर 2' च्या अॅडव्हान्स बुकिंगवरून अक्षयचा चित्रपट टिकाव धरेल, याची शक्यता सध्या तरी कमी दिसते आहे. विशेष म्हणजे 'गदर 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 30 ते 35 कोटींची कमाई करणार आहे.
हेही वाचा :