ETV Bharat / entertainment

Gadar 2 New Song Out : 'गदर २' मधील ठेका धरायला लावणारे 'मैं निकला गड्डी लेके' गाणे लॉन्च - गदर २

'गदर २'चे आणखी एक गाणे गुरुवारी रिलीज झाले आहे. निर्मात्यांनी चित्रपटातील 'मैं निकला गड्डी लेके'ची नवीन आवृत्ती रिलीज केली आहे. हे गाणे चाहत्यांना खूप आवडले आहे.

Gadar 2
गदर २
author img

By

Published : Aug 3, 2023, 5:03 PM IST

मुंबई : सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा आगामी चित्रपट 'गदर २' सध्या प्रचंड चर्चेत आहे. आदल्या दिवशी प्रदर्शित झालेल्या 'उड जा काले कावा' या गाण्याच्या रिप्राइज्ड व्हर्जनने प्रेक्षकांची मने जिंकली. दरम्यान, आता निर्मात्यांनी 'मैं निकला गड्डी लेके'ची रिप्राइज्ड व्हर्जन रिलीज केले आहे. हे गाणे दोन दशकांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरले होते. या नवीन व्हर्जनची खूप प्रशंसा केली जात आहे. आता सोशल मीडियावर हे गाणे खूप व्हायरल झाले आहे. 'गदर २' चित्रपटातील अनेक गाणे हे हिट झाले होते. आता पुन्हा एकदा या नवीन व्हर्जनने सनी देओल रूपेरी पडद्यावर धुमाकुळ घालणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ट्रेंडिंग गाणे : 'मैं निकला गड्डी लेके' गाण्याची सुरुवात उत्कर्ष शर्मा (चरणजीत) हा वडील सनी देओल (तारा सिंग) यांच्याकडे मोटारसायकलची मागणी करतो. यावर अमिषा पटेल म्हणजेच सकिना मुलाची बाजू घेताना दिसत आहे. त्यानंतर गाण्यात एक पार्टी दाखविण्यात आली आहे. या पार्टीत तारा सिंग आपल्या मुलाला बाईक गिफ्ट करतो. त्यानंतर आयकॉनिक ट्रॅकवर तारा सिंग , चरणजीत आणि सकिना डान्स करतात. गाण्यामध्ये सनी आणि अमिषा यांच्यातील एक रोमँटिक सीक्‍वेन्स देखील दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये तारा सिंह आणि सकिना यांच्यातील प्रेम दोन दशकांनंतरही कायम आहे. हे गाणे खूप जबरदस्त आहे.

मैं निकला गड्डी लेकेने त्याचे मूळ आकर्षण कायम ठेवले : 'मैं निकला गड्डी लेके'ची नवीन आवृत्तीमध्ये आधीच्या गाण्याची झलक कायम ठेवत गाणे तयार केले गेले आहे. दरम्यान उदित नारायणसोबत त्यांचा मुलगा आदित्य नारायणने सनी देओल आणि उत्कर्ष शर्मा यांच्यावर अभिनीत केलेल्या गाण्याला आवाज दिला आहे. तसेच शबिना खानने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

काय असेल 'गदर २'ची कथा? : हे गाणे रिलीज झाल्यानंतर 'गदर २'ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांचा उत्साह गगनाला भिडला आहे. दरम्यान तारा सिंग १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात आपल्या देशाच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सन्मानासाठी लढताना दिसणार आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा :

  1. 8 films sold out on ott platform : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊन ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजले 'हे' चित्रपट...
  2. Chrisann Pereira : अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अडकलेली क्रिसन परेराची निर्दोष सुटका...
  3. Dharmendra Deol And Ranveer Singh: धर्मेंद्रने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या सेटवरील रणवीर सिंगसोबतचा शेअर केला फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.