ETV Bharat / entertainment

Gadar 2 and omg 2 box office collection day 25 : 'गदर 2'ने 500 कोटीचा टप्पा केला पार ; 'ओएमजी 2'च्या कमाईत झाली घसरण...

Gadar 2 and omg 2 box office collection day 25 : सनी देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहेत. 'गदर 2'ने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे विक्रम तोडले आहेत. दरम्यान आता 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'च्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Gadar 2 and omg 2 box office collection day 25
गदर 2 आणि ओएमजी 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 25
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 3:49 PM IST

Gadar 2 Vs OMG 2 BO Collection Day 25 : सनी देओल स्टारर 'गदर 2' आणि अक्षय कुमार स्टारर 'ओएमजी 2' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहेत. हे दोन्ही चित्रपट तीन आठवड्यांहून अधिक काळापासून चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. 'गदर 2'ने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत. चौथ्या आठवड्यातही 'गदर 2'ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. 'गदर 2'ने रिलीजच्या पहिल्याच दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केलं होतं. हा चित्रपट 60 कोटीच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटपेक्षा अधिक कमाई केली आहे. दरम्यान आता जाणून घेऊया 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'ने आतापर्यंत किती कमाई केली तर....

'गदर 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'गदर 2' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 40 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 284.63 कोटीचा व्यवसाय केला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 134.47 कोटीचा गल्ला जमवला. तिसऱ्या आठवड्यात 63.35 कोटीची कमाई केली. त्याचबरोबर चौथ्या आठवड्यातही हा चित्रपट जबरदस्त व्यवसाय करत आहे. चौथ्या शुक्रवारी या चित्रपटाने 5.2 कोटी, चौथ्या शनिवारी 5.72 कोटी, चौथ्या रविवारी 7.80 कोटीचा व्यवसाय केला आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 501.17 कोटी झाले आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या 25व्या दिवशी 3 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 504.17 कोटी होईल.

'ओएमजी 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : अक्षय कुमार स्टारर 'ओएमजी 2' हा पहिल्या दिवसापासूनच सनीच्या 'गदर 2'ला टक्कर देत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हळूहळू कमाई करत आहे. 'ओएमजी 2' चित्रपटला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार पहिल्याच दिवशी 'ओएमजी 2'ने जवळपास 10 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 85.05 कोटींचे कलेक्शन केले होते. तसंच 'ओएमजी 2' ने दुसऱ्या आठवड्यात 41.37 कोटीचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 15.4 कोटींची कमाई केली. दरम्यान सध्या चौथ्या आठवड्यात 'ओएमजी 2'च्या कमाईत घसरण होत आहे. चौथ्या शुक्रवारी या चित्रपटाने 1.1 कोटी, चौथ्या शनिवारी 1.60 कोटी, चौथ्या रविवारी 2.20 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 146.72 कोटी झाले आहे. हा चित्रपट रिलीजच्या 25व्या दिवशी 1.13 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 147.82 कोटी होईल.

हेही वाचा :

  1. Dream girl २ box office collection day ११ : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर करत आहे जादू...
  2. Kushi BO Collection Day 2: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर 'खुशी'ने केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई....
  3. Jawan advance booking: शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटना प्रदर्शित होण्यापूर्वीच केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या आकडेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.