मुंबई - Latest 3 flims BO collection : 'फुक्रे 3', 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' हे तीन चित्रपट 28 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले. ज्यामध्ये 'फुक्रे 3'नं पहिल्या दिवशी बॉक्सवर चांगली कमाई केली. तर 'द वॅक्सीन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2'हे चित्रपट प्रेक्षकांचे मनं जिंकण्यात अयशस्वी ठरले आहेत. फुक्रे 3' नं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.82 कोटीची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 7.81 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 11.67 कोटीचा व्यवसाय केला आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे 28.3 कोटी झाले आहे. दरम्यान आता रविवारी हा चित्रपट 14.00 कोटीची कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे 42.30 होईल. 'फुक्रे 3' चित्रपटामध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'फुक्रे 3'चे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केले असून या चित्रपटाची निर्मित एक्सेल एंटरटेनमेंट केली आहे.
'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटाचे कलेक्शन : विवेक अग्निहोत्रीचा 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट संथ गतीनं कमाई करत आहे. 'द व्हॅक्सिन वॉर'नं पहिल्या दिवशी 85 लाखचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 90 लाखाची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटानं तिसऱ्या दिवसी 1.75 कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटानं तीन दिवसात 3.5 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट चौथ्या दिवशी 2.50 कोटीची कमाई करू शकतो असा अंदाज लावला जात आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे 6.00 कोटी होईल. 'द व्हॅक्सिन वॉर' कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये नाना पाटेकर, पल्लवी जोशी, रायमा सेन, सप्तमी गौडा आणि अनुपम खेर हे मुख्य भूमिकेत आहेत.
'चंद्रमुखी 2' एकूण कलेक्शन : 'फुक्रे 3' आणि 'द वॅक्सीन वॉर' सोबतच कंगना राणौत स्टारर 'चंद्रमुखी 2' देखील रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 8.25 कोटीची कमाई केली होती. त्यानंतर 'चंद्रमुखी 2'नं दुसऱ्या दिवशी 4.35 कोटीचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 4.86 कोटी कमाई केली. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 17.46 झाले आहेत. हा चित्रपट आता रिलीजच्या चौथ्या दिवसात आहे. चौथ्या दिवशी 'चंद्रमुखी 2' चित्रपट 5.02 कोटींची कमाई करू शकतो. यासह चित्रपटाचे चार दिवसांचे एकूण कलेक्शन 22.66 कोटी रुपये होईल. 'चंद्रमुखी 2' मध्ये कंगना राणौत, राघवेंद्र लॉरेन्स, वादिवेलू, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार आणि राधिका सरथकुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा :