नवी दिल्ली - Fukrey 3 gang recall their jugaad : 'फुक्रे 3' चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये स्वतःला झोकून देताना दिसत आहे. दिल्लीच्या रस्त्यावर उतरुन टीमने धमाल केली. यावेळी त्यांनी रस्त्यावरील गोलगप्पांचा आस्वाद घेतला आणि जुन्या आठवणीतही प्रेक्षकांना सामील करुन घेतलं. अभिनेता पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग आणि अभिनेत्री रिचा चड्ढा या कलाकारांनी 'फुक्रे 3' चित्रपटाबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल आणि चित्रपटाच्या तिसर्या भागाकडून त्यांच्या अपेक्षांबद्दल स्पष्ट मतं व्यक्त केली. त्यांच्या शालेय आठवणी सांगताना धमाल किस्सेही सांगितले आणि खडतर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्या काळात केलेल्या जुगाडच्याही आठवणी सांगितल्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'फुक्रे 3' मध्ये चुचाची व्यक्तीरेखा कशी विकसीत झाली योबद्दल बोलताना वरुणने एएनआयला सांगितले, 'च्या परिस्थिती बदलली असली तरी मानसिकदृष्ट्या तो तसाच राहिला आहे. उलट त्याच्यातला वेडेपणा वाढलाय आणि ‘फुक्रे’ आणि ‘फुक्रे रिटर्न्स’ पेक्षा या चित्रपटात तो अधिक क्रेझी आहे.' पुढे तो म्हणाला की, जर 'फुक्रे 4' बनवला गेला तर तो फुक्रे 3 मधील सर्वात क्रेझी व्यक्ती असेल.
नव्या चित्रपटाबद्दल उत्साहित असणाऱ्या पुलकित सम्राटने वे फुकरे याण्यात त्याने केलेल्या स्टेप्सचे सलमान खानने कौतुक केले त्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला,'त्याचे मन मोठे आहे. तो कौतुक करताना हातचे काही राखून ठेवत नाही. त्याला जी गोष्ट आवडते त्याबद्दल तो मोकळेपणाने बोलतो आणि काही आवडलं नाही तर बिनधास्त टीकाही करतो. मी त्या अर्थाने भाग्यवान आहे की त्याने माझ्याबद्दल आपुलकी दाखवली. मला खात्री आहे की चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला तो आवडेल. त्याला 'फुक्रे' फ्रँचायझी आणि चित्रपटाचे पूर्वीचे भाग खूप आवडले होते. तिसरा भाग येत असल्यामुळे त्यालाही आनंद झालाय.'
भोली पंजाबनच्या भूमिकेसाठी रिचा चड्ढाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळालं होतं. आता फुक्रेच्या तिसऱ्या भागात ती चुचाच्या विरोधात निवडणूक लढवताना दिसणार आहे. याबद्दल बोलताना रिचा म्हणाली, 'भोली पंजाबनसाठी वातावरण एकदम अनुकूल आहे, म्हणूनच ती निवडणूकीला उभी आहे. भोली आणि चुचा यांच्यातील निवडणूक पाहून प्रेक्षकांना आनंद होईल.'
फुक्रे टीमने शालेय जीवनात केलेल्या जुगाडाचाही उल्लेख प्रमोशनदरम्यान केला. वरुण म्हणाला,'मी रिपोर्ट कार्डवर पालकांच्या जागी मित्रांच्या सह्या घेतल्या होत्या. एकदा तर मी रिपोर्ट कार्ड प्रिंटिंग प्रेसमधून छापून घेतलं होतं आणि नंतर त्याबद्दल घरीही सांगितलं होतं.'
‘फुक्रे’ गँगला ‘फुक्रे ३’ चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत कारण बॉलीवूड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. रिचाचड्ढाने सांगितले की, 'कोविडच्या काळात लोक घरातच बंदिस्त झाले होते पण आता ते थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत. मला आशा आहे की 'जवान' आणि 'गदर 2' या चित्रपटाप्रमाणेच 'फुक्रे 3' बॉक्स ऑफिसवरही चांगले काम करेल.'
‘फुक्रे ३' हा चित्रपट मृघदीप सिंग लांबा यांनी दिग्दर्शित केला आहे आणि रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे. 'फुक्रे' या कॉमेडी-ड्रामाचा तिसरा भाग 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
हेही वाचा -
२. Sunny Deol : सन देओल धर्मेंद्रसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर, पिझ्झा खातानाचा फोटो व्हायरल
३. Jai Ganesha song from Ganpath : टायगर श्रॉफच्या 'गणपथ'मधील जय गणेशा गाणे रिलीज