ETV Bharat / entertainment

Ravrambha : 'रावरंभा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित! अभिनेते अशोक समर्थ साकारणार सरसेनापती प्रतापराव गुजर यांची भूमिका - रावरंभा चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

'रावरंभा' चित्रपटाचे चित्रीकरण संपून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ची (Ravrambha) कथा काय आहे? तसेच यात कोण कोण कलाकार आहेत ? हे अद्याप गुलदस्त्यात असताना, स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची लक्षवेधी झलक समोर आली आहे.

Ravrambha
रावरंभा
author img

By

Published : Dec 5, 2022, 1:59 PM IST

मुंबई : हल्ली ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची दाद मिळताना दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट ही तर तमाम आबालवृद्धांना पर्वणीच असते. सहकुटुंब पहावे असे हे चित्रपट असतात. त्यामुळे खासकरून मराठी मध्ये, ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. त्यातीलच एक म्हणजे 'रावरंभा' (Ravrambha).

चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज : 'रावरंभा' चित्रपटाचे चित्रीकरण संपून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ची (Ravrambha) कथा काय आहे? तसेच यात कोण कोण कलाकार आहेत ? हे अद्याप गुलदस्त्यात असताना, स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची लक्षवेधी झलक समोर आली आहे.

लक्षवेधी झलक : स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची लक्षवेधी झलक समोर आली आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आपली छाप उमटवणारे अभिनेते अशोक समर्थ (Ashok Samarth) दिसत आहेत. पोस्टरवर सरसेनापतींच्या गौरवार्थ 'निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते, गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते' अशी जोशपूर्ण ओळ लिहिली आहे. यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर (Prataprao Gujar) हे चारही बाजूंनी शत्रूने घेरलेले असताना युद्ध करताना दिसत आहे. शत्रूवर तुटून पडताना दिसत आहेत.

सातारमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट : स्वराज्याच्या चौथ्या राजधानीतील म्हणजे शाहूनगरी सातारमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असून शशिकांत पवार प्रॉडक्शन अंतर्गत या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे (Director Anup Jagdale) यांनी सांभाळली आहे.

भव्यदिव्य ऐतिहासिक कलाकृती : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून ‘रावरंभा’चे नेमके कथानक काय आहे याची उत्सुकता वाढली आहे. लवकरच यातील प्रत्येक पात्र रसिकांसमोर येणार असून ‘रावरंभा’ ही भव्यदिव्य ऐतिहासिक कलाकृती प्रेक्षकांना दिसणार आहे. ‘रावरंभा’ हा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असणारा बहुचर्चित, भव्यदिव्य चित्रपट ७ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.