मुंबई - विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमचे आवडते ऑफ स्क्रीन जोडपे विकी आणि कॅटरिना पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. फार उतावीळ होऊ नका, ते चित्रपटात दिसणार नाहीत तर दोघेही एका टीव्ही जाहिरातीत एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या शूटचे फोटो व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये, दोघेही आरामदायक सुट्टीतील कपडे घातलेले दिसतात. ते दोघे सुंदर दिसतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
या जोडप्याने डिसेंबर 2021 मध्ये राजस्थानमध्ये एका जिव्हाळ्याच्या विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. जरी या जोडप्याने सार्वजनिकरित्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे कधीही मान्य केले नसले तरी, त्यांनी गाठ बांधण्यापूर्वी सुमारे दोन वर्षे डेटिंग केली. 'कॉफी विथ करण'मध्ये, कॅटरिनाने खुलासा केला होता की ती झोया अख्तरच्या पार्टीत विक्कीला भेटली आणि तेव्हापासूनच त्यांच्यात प्रणय सुरू झाला.
![विकी आणि कॅटरिना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/k2_1409newsroom_1663142146_902.jpg)
विकीसोबतच्या तिच्या नातेसंबंधाचे तपशील शेअर करताना, कॅटरिनाने सांगितले की, विकी तिच्या 'रडार'वर कधीच नव्हता. ती म्हणाली, "मला त्याच्याबद्दल फारशी माहितीही नव्हती. त्याचं फक्त एक नाव होतं ज्याबद्दल मी ऐकलं होतं पण त्याच्याशी कधीच संबंध आला नव्हता. पण नंतर, जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा त्याने मला जिंकले!"
![विकी आणि कॅटरिना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/k3_1409newsroom_1663142146_452.jpg)
दरम्यान, वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कॅटरिना पुढील हॉरर कॉमेडी चित्रपट 'फोन भूत' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्यासोबत दिसणार आहे, जो 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय, ती दक्षिण अभिनेता विजय सेतुपतीसह 'मेरी ख्रिसमस' आणि सलमान खानसोबत 'टायगर 3'चा एक भाग आहे, जो 23 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे.
दरम्यान, विकी कौशल 'गोविंदा नाम मेरा'मध्ये भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. लक्ष्मण उतेकरच्या शीर्षक न ठरलेल्या चित्रपटामध्ये तो सारा अली खानसोबत दिसणार आहे. या दोघांशिवाय त्याच्याकडे आनंद तिवारीचा तृप्ती दिमरी आणि मेघना गुलजारचा 'सॅम बहादूर' हा अनटायटल्ड चित्रपट आहे, ज्यामध्ये सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख हे सहकलाकार आहेत. 'सॅम बहादूर' हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे.
हेही वाचा - National Cinema Day : १६ ऐवजी २३ सप्टेंबरला 4000 हून अधिक स्क्रीनवर 75 रुपयांमध्ये चित्रपट