मुंबई - film Shivarayancha Chhawa : 'सुभेदार' या चित्रपटाच्या रिलीजनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी 'शिवरायांचा छावा' या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची कथा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित असेल. या चित्रपटाची घोषणा एक व्हिडिओ झलकसह करण्यात आली आहे.
-
AFTER ‘SUBHEDAR’, DIGPAL LANJEKAR ANNOUNCES NEXT: ‘SHIVRAYANCHA CHHAVA’… After the success of #Marathi film #Subhedar, director #DigpalLanjekar announces his next directorial #ShivrayanchaChhava… The #Marathi film is based on #ChhatrapatiSambhajiMaharaj.
— taran adarsh (@taran_adarsh) September 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Produced by Vaibhav… pic.twitter.com/8U9y2iFTOK
">AFTER ‘SUBHEDAR’, DIGPAL LANJEKAR ANNOUNCES NEXT: ‘SHIVRAYANCHA CHHAVA’… After the success of #Marathi film #Subhedar, director #DigpalLanjekar announces his next directorial #ShivrayanchaChhava… The #Marathi film is based on #ChhatrapatiSambhajiMaharaj.
— taran adarsh (@taran_adarsh) September 25, 2023
Produced by Vaibhav… pic.twitter.com/8U9y2iFTOKAFTER ‘SUBHEDAR’, DIGPAL LANJEKAR ANNOUNCES NEXT: ‘SHIVRAYANCHA CHHAVA’… After the success of #Marathi film #Subhedar, director #DigpalLanjekar announces his next directorial #ShivrayanchaChhava… The #Marathi film is based on #ChhatrapatiSambhajiMaharaj.
— taran adarsh (@taran_adarsh) September 25, 2023
Produced by Vaibhav… pic.twitter.com/8U9y2iFTOK
वैभव भोर आणि किशोर पाटकर यांनी निर्मिती केला शिवरायांचा छावा हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वत्र थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शि 'सुभेदार' हा चित्रपट अलिकडे रिलीज झाला होता. त्याला नेहमी प्रमाणेच प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. आता हा चित्रपट थिएटरमधून उतरला असला तरी ओटीटीवर सुरू आहे. 'सुभेदार' या चित्रपटात सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या अद्वितीय पराक्रमाची कथा दाखवली गेली होती. कोंढाणा किल्ला जिंकत असताना झालेल्या निकराच्या लढाईत प्राणांची बाजी लावून लढलेल्या सुभेदार तान्हाजींची ही कथा अंगावर रोमांच उभी करणारी ठरली. खरंतर याच विषयावर यापूर्वी अजय देवगणने तान्हाजी हा चित्रपट बनवला होता. त्यापार्श्वभूमीवर सुभेदार चित्रपटाकडून खूप अपेक्षा बाळगण्यात आल्या होत्या. दिग्पाल लांजेकर यांचा 'शिवाष्टक' मालिकेतला सुभेदार हा पाचवा चित्रपट होता. याआधी त्याने फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज या चित्रपटांना शिवप्रेमी चित्रपट रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभलाय. आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व दाखवणारा चित्रपट दिग्पाल लांजेकर बनवत आहे. शिवाष्टकांतील 'शिवरायांचा छावा' हा सहावा चित्रपट आहे.
अलिकडच्या काही वर्षात ऐतिहासिक चित्रपटांना उदंड प्रेक्षक वर्ग मिळतोय, हे लक्षात आल्यानंतर अनेकांनी यावर चित्रपट बनवले. पण दिग्पालने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या नरवीरांच्या पराक्रमावर बेतलेल्या आठ चित्रपटांच्या निर्मितींची घोषणा केली आणि सातत्याने मेहनत घेतली. त्याने ऐतिहासिक चित्रपटांसाठी आपला एक खास ठसा उमटवला असून प्रेक्षक वर्गही निर्माण करण्यात दिग्पालला यश लाभलंय. अर्थात प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हानही त्याला पेलायचंय.
हेही वाचा -
२. Dev Anand 100th Birth Anniversary: सदाबहार नायक आणि स्टाईल आयकॉन देव आनंदच्या आठवणी