ETV Bharat / entertainment

'फायटर'मधील पहिले गाणे 'शेर खुल गए' झाले लॉन्च, हृतिक रोशनच्या डान्सचा अप्रतिम जलवा

Fighter song Sher Khul Gaye: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर फायटर चित्रपटातील शेर खुल गए हे पहिले गाणे 15 डिसेंबर रोजी लॉन्च करण्यात आले. विशाल दादलानी आणि शेखर रावजियानी यांनी संगीतबद्ध केलेले हे पार्टी अँथममध्ये बॉस्को मार्टिस आणि जी सीझर यांनी कोरिओग्राफ केले आहे. या गाण्यात हृतिक आणि दीपिकाची उत्तम केमेस्ट्री पाहायला मिळते.

Fighter song Sher Khul Gaye
'फायटर'मधील पहिले गाणे 'शेर खुल गए' झाले लॉन्च
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 4:25 PM IST

मुंबई - Fighter song Sher Khul Gaye: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित 'फायटर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी १५ डिसेंबर रोजी चित्रपटातील पहिले गाणे रिलीज केले. प्रमोशनच्या पारंपारिक मार्गावरून न चालता चित्रपटाच्या टीमने ट्रेलरच्या आधी संगीताचा ट्रेंड स्वीकारला आहे. या गाण्याच्या लॉन्चिंगसाठी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या गाण्यामध्ये हृतिक आणि दीपिका या करिश्माई जोडी थिरकताना दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आपल्या जबरदस्त नृत्य कौशल्यासाठी ओळखला जाणारा हृतिक रोशन 'शेर खुल गए' गाण्यावर त्याच्या नेहमीच्या ऊर्जेनं थिरकला आहे. त्याला बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर का म्हणतात हे त्यानं या गाण्यातून पुन्हा एकदा सिद्ध केलंय. बॉस्को मार्टिस आणि सीझर गोन्साल्विस यांनी कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यावर अप्रतिम डान्स करुन दीपिका पदुकोणनेही त्याला उत्तम साथ दिली आहे. हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री पडद्यावर किती कमाल करु शकते याचा प्रत्यय या गाण्यामुळे येऊ शकतो.

'फायटर'मधील शेर खुल गए गाणे सोशल मीडियावर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, "प्रतीक्षा संपली! स्क्वॉड्रन लीडर्स शमशेर पठानिया उर्फ 'पॅटी' आणि मिनल राठौर उर्फ 'मिन्नी'सह डान्स फ्लोअरवर मुव्ह करा."

'फायटर'मधील 'शेर खुल गए' हे गाणे विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्याचे बोल कुमार आणि विशाल ददलानी यांनी लिहिले आहेत. हे पार्टी गीत बेनी दयाल आणि शिल्पा राव यांनी गायले आहे तर विशाल आणि शेखर यांनीही या गाण्याला आवाज दिला आहे.

'शेर खुल गए'चे संक्रामक बीट्स प्रसिद्ध संगीत जोडी विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांनी संगीतबद्ध केले आहेत. कुमार आणि विशाल ददलानी यांनी लिहिलेल्या या दमदार पार्टी अँथमने मंचाला आग लावली. हा ट्रॅक बेनी दयाल आणि शिल्पा राव यांचा आहे, तर त्यात स्वतः विशाल आणि शेखर यांचे डायनॅमिक आवाज देखील आहेत ज्यामुळे अधिक सुंदर झालं आहे.

'शेर खुल गए' गाण्याच्या रिलीजसाठी याहून उत्तम वेळ दुसरी असू शकणार नाही. कारण आता वर्ष अखेर सुरू झालं असून जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हे सर्वोत्तम गाणं ठरु शकतं.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' चित्रपटात हृतिक रोशन तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहे. यापूर्वी या जोडीनं बॅंग बँग आणि वॉर सारख्या बॉक्स ऑफिस हिट चित्रपटातून एकत्र काम केलं आहे.

अलिकडेच लॉन्च करण्यात आलेल्या 'फायटर'च्या कॅरेक्टर पोस्टर्समध्ये मुख्य कलाकारांच्या उत्कंठावर्धक भूमिका दिसून आल्या. हृतिक रोशनने स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानियाची भूमिका साकारली आहे, तर दीपिका पदुकोणने स्क्वॉड्रन लीडर मीनल राठौरची भूमिका साकारत आहे. हृतिक आणि दीपिका यांच्यासह, अनिल कपूर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या भूमिकेत एक आकर्षण ठरणार आहे. 'फायटर'मध्ये स्क्वाड्रन लीडर सरताज गिलची भूमिका साकारणाऱ्या करण सिंग ग्रोव्हर आणि स्क्वाड्रन लीडर बशीर खानची भूमिका साकारणाऱ्या अक्षय ओबेरॉय यांचेही चेहरे पोस्टरवर झळकले आहेत.

सिद्धार्थ आनंदच्या मार्फलिक्स पिक्चर्स आणि वायकॉम 18 स्टुडिओने बनवलेला 'फायटर' चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होईल.

हेही वाचा -

1. अभिनेता श्रेयस तळपदेवर हार्ट अटॅकनंतर अँजिओप्लास्टी, हॉस्पिटलने कोणती दिली माहिती?

2. 'लुट पुट गया' गाण्यावर थिरकला ख्रिस गिल, शाहरुख खाननं केलं त्याच्या कोरिओग्राफीचं कौतुक

3. शुटिंगनंतर श्रेयस तळपदेला उच्च रक्तदाबाचा त्रास, रुग्णालयात उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.