ETV Bharat / entertainment

केजीएफ स्टार यशच्या बर्थडे निमित्त मोठा कट-आउट उभारताना अपघात, तिघांचा मृत्यू

accident mars Yash birthday celebration : केजीएफ स्टार यशच्या 38 व्या वाढदिवसादिवशी, त्याचा मोठा कट-आउट उभारताना तिघांना आपला जीव गमवावा लागला. कर्नाटकातील गदग जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत इतर तिघांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 4:12 PM IST

accident mars Yash birthday celebration
यशच्या बर्थडे निमित्त मोठा कट-आउट उभारताना अपघात

गदग (कर्नाटक) - accident mars Yash birthday celebration : केजीएफ स्टार यशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठा कट-आउट उभारताना एका हृदयद्रावक घटनेत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर शहराजवळ असलेल्या सोरनागी गावात सोमवारी पहाटे ही दुःखद घटना घडली. सध्या जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हनुमंत हरिजन ( वय 24 ) , मुरली नादुमणी ( वय 20 ) आणि नवीन गाजी ( वय 20 ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मंजुनाथ हरिजन, प्रकाश म्यागेरी आणि दीपक हरिजन अशी जखमी तरुणांची नावे असून, या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत.

केजीएफ चित्रपट मालिकेचा सुपरस्टार यश याच्या 8 जानेवारीला वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील उत्साही तरुणांचा एक गट एकत्र येऊन कट-आउट उभारत होता. दुर्दैवाने, रात्रीच्या अंधारामुळे परिसरात हाय-टेन्शन इलेक्ट्रिक वायर असल्याबद्दल त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे हा धक्कादायक अपघात घडून आला.

स्थानिक आमदार चंद्रू लमाणी यांनी लक्ष्मेश्वर येथील रूग्णालयाला भेट देऊन उपचार सुरू असलेल्या जखमींची विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आणि या कठीण काळात पाठिंबा दिला.

यावेळी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एच. पाटील यांनी उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून माहिती गोळा केली आहे. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.

एसपी बी.एस. यशच्या फॅन ग्रुपचे अंदाजे नऊ सदस्य लोखंडी फ्रेमसह कट-आउट बसवत होते. दुर्दैवाने कट आउट उभारताना त्याचा संपर्क हाय टेन्शन तारेशी आला, त्यामुळे ही दुःखद घटना घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या घटनेनंतर, मृतांचे मित्र आणि त्यांचे कुटुंबीय यशला गावाला भेट देण्याची आणि या आव्हानात्मक काळात शोकग्रस्त कुटुंबांना पाठिंबा देण्याची विनंती करत आहेत. कुटुंबीय आणि नातेवाईक मृत तरुणांना गमावून बसले आहे आणि जखमी बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा -

1. विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना फेब्रुवारीमध्ये करणार साखरपुडा?

2. राजकारणातला 'मातोश्री' हा अजिंक्यतारा, किरण मानेंची सोशल मीडियातील पोस्ट चर्चेत

3. नवविवाहित अरबाज खान आणि शुरा खान झाले स्पॉट, फोटोसाठी लाजली नवी नवरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.