ETV Bharat / entertainment

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने व्हिडिओतून जागवल्या सुशांत सिंग राजपूतसोबतच्या आठवणी - पवित्र रिश्ता शो

पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ताला 14 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शेअर पोस्ट आहे. अंकिताने व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Ankita Lokhande
अंकिता लोखंडे
author img

By

Published : Jun 1, 2023, 2:38 PM IST

मुंबई : अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा डेब्यू टेलिव्हिजन शो पवित्र रिश्ताला गुरुवारी १४ वर्षे पूर्ण झाली आहे. या प्रसंगी अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिने आपल्या पोस्टला कॅप्शन देत लिहले, 'पवित्र रिश्ताची 14 वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीही मला माझ्या पहिल्या बाळाशी खूप जोडल्या सारखे वाटते.. प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार!! एकता कपूर तुमचे खूप खूप आभार. की मी तुमची अर्चू होऊ शकेन हा माझ्यावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवला आणि अर्चना म्हणून मला नवीन ओळख दिल्याबद्दल थँकू कारण शो दरम्यान ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केले ते मला पाहतात किंवा भेटतात तेव्हा ते देखील, मला अर्चू या नावने हाक मारतात त्यावेळी मला खूप चांगले वाटते.. तसेच सर्वांचे मनःपूर्वक आभार ज्यांनी पवित्र रिश्ता नावाचा सुंदर कार्यक्रम मनापासून आणि जिवाभावाने पाहिला आहे.. मी सदैव त्यांची ऋणी आहे'. असे अंकिताने इंस्टाग्रामवर पोस्ट केली.

पवित्र रिश्ता शो : एकता कपूरने तयार केलेला हा शो मानव (सुशांत) आणि अर्चना (अंकिता) या विवाहित जोडप्याभोवती फिरणारा होता. या शोद्वारे हे दोघे घराघरात लोकप्रिय झाले होते. खरं तर, केवळ रील लाइफमध्येच नाही तर शोच्या शूटिंगदरम्यान दोघे खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते दोघे वेगळे झाले. अकिंताने पोस्ट टाकल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी लाल हार्ट इमोजी आणि भावनिक संदेशांसह कमेंट केली आहे. अकिंताच्या या पोस्टवर भरभरून कमेंट येत आहे. एका चाहत्यांने या पोस्टवर लिहले, 'सुशांत तुला प्रत्येक मिनिटाला मिस करतोस,' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'होय हा माझा सर्वात आवडता शो होता. अशा अनेक कमेंट चाहते करत आहे.

सुशांतचा मृत्यू : 14 जून 2020 रोजी वयाच्या 34 व्या वर्षी सुशांत मृत्यू झाला होता. तसेच त्याचा मृत्यू हा वांद्रे येथील निवासस्थानी झाला होता. त्यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. दरम्यान, अंकिता ही 'स्वातंत्र्य वीर सावरकर' दिवंगत स्वातंत्र्यसैनिक, विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा सोबत दिसणार आहे. या चित्रपटात अमित सियाल यांचीही प्रमुख भूमिका आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाद्वारे रणदीप हुड्डा दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. Pushpa 2 actors bus accident : पुष्पा-२ ची टीम एका रस्ता अपघाताची शिकार ; जखमी कलाकार रुग्णालयात दाखल
  2. R Madhavans birthday : उत्कृष्ट अभिनेता ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, आर माधवनचा चढता प्रवास
  3. Priyanka chopra reaction : प्रियांका चोप्राने पती निक जोनासच्या 'द गुड हाफ' या चित्रपटावर दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.