मुंबई - नवाजुद्दीन सिद्दीकीची विभक्त पत्नी आलिया सिद्दिकीने नव्या मित्रासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यासोबत तिने खास कॅप्शनही लिहिली होती. यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. यातच एका युजरने दिला आडनाव बदलण्याचा सल्लाही दिला. या युजरला आलिया सिद्दीकीने प्रत्युत्तर दिले आहे.
आलियाने अलिकडेच इंस्टाग्रामवर कोणाच्यातरीसोबतच्या फोटोसह एक नोट पोस्ट केली होती. फोटोत ती तिच्या 'मित्र'जवळ झुकली होती आणि कॅमेराकडे हसून पोझ देताना दिसते. ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये फॉफीसाठी भेटले असे दिसत आहे. आलियाने फोटोला कॅप्शन दिले, 'माझ्या मौल्यवान नातेसंबंधातून बाहेर पडण्यासाठी मला 19 वर्षे लागली. पण, माझ्या आयुष्यात, माझी मुले नेहमीच माझे लक्ष केंद्रस्थानी राहिली आहेत आणि राहतील. असे असली तरी त्याहूनही काही संबंध मोठे आहेत. मैत्रीपेक्षा आणि त्या पलीकडे, हे त्यापैकी एक नाते आहे, आणि मला याचा खरोखर आनंद आहे, म्हणून माझा आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचा आहे. आनंदी राहणे हा माझा अधिकार नाहीय का?'
पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने कमेंट केली की, 'मग आडनाव बदलून टाका तुम्ही'. यावर अत्तर देताना आलियाने लिहिले, 'लवकरच तेही होईल.' यानंतर अनेकांनी दिला या नव्या नात्याबद्दल शुभेच्छा दिल्या व अभिनंदनही केले.
आलियाने या वर्षाच्या मार्चमध्ये इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता आणि तिच्या नाव बदलण्याबद्दल सांगितले होते. 'जोपर्यंत माझे नाव श्रीमती आलिया सिद्दीकी आहे, ते फक्त काही दिवसांसाठी आहे आणि एकदा मी अधिकृतपणे घटस्फोट घेतल्यानंतर, मी माझ्या मूळ आणि पूर्वीच्या ओळखीत परत येईन आणि मी कायमस्वरूपी आणि अधिकृतपणे माझे नाव बदलत आहे. मिसेस आलिया सिद्दीकी कडून मिस अंजना किशोर पांडे', असे तिने लिहिले होते.
नवाजुद्दीन आणि आलिया यांच्यात काही काळापासून भांडण सुरू आहे. त्यांना शोरा ही १२ वर्षाची मुलगी आणि यानी हा ७ वर्षांचा मुलगा आहे. आपल्या मुलांना उघडण्यावर सोडल्याचा आरोप काही दिवसापूर्वी आलियाने नवाझवर केला होता. तर नवाजुद्दीननेही आपल्या नकळत आलियांने मुलांना दुबईहून भारतात आणल्याचे म्हटले होते.