मुंबई - प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता प्रदीप सरकार यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी २४ मार्च रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी परिणीता, मर्दानी, लागा चुनरी में दाग, आणि हेलिकॉप्टर ईला यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. गेल्या काही दिवसापासून त्यांचे डायलेसिस सुरू होते. त्यांच्या तब्येत ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
-
Very sad to know about our dearest director @pradeepsrkar dada. I started my career with him. He had an aesthetic talent to make his films look larger than life. From #Parineeta#lagachunrimeindaag to a no. Of movies. Dada, you will be be missed. #RestInPeace 🙏😔 @SrBachchan pic.twitter.com/TDxUOP2quG
— Nitu Chandra Srivastava (@nituchandra) March 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Very sad to know about our dearest director @pradeepsrkar dada. I started my career with him. He had an aesthetic talent to make his films look larger than life. From #Parineeta#lagachunrimeindaag to a no. Of movies. Dada, you will be be missed. #RestInPeace 🙏😔 @SrBachchan pic.twitter.com/TDxUOP2quG
— Nitu Chandra Srivastava (@nituchandra) March 24, 2023Very sad to know about our dearest director @pradeepsrkar dada. I started my career with him. He had an aesthetic talent to make his films look larger than life. From #Parineeta#lagachunrimeindaag to a no. Of movies. Dada, you will be be missed. #RestInPeace 🙏😔 @SrBachchan pic.twitter.com/TDxUOP2quG
— Nitu Chandra Srivastava (@nituchandra) March 24, 2023
जाहिरात क्षेत्र आणि म्यूझिक व्हिडिओमध्ये नाव कमावले - मुन्नाभाई M.B.B.S.चे एडिटर म्हणून चित्रपटांमध्ये जाण्यापूर्वी बहु-हायफनेटेड चित्रपट निर्मात्याने जाहिरात क्षेत्रात स्वत: साठी एक स्थान निर्माण केले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी जाहिरात उद्योगात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 17 वर्षांच्या कारकिर्दीत जाहिरात क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर, सरकार यांनी 2005 मध्ये परिणीता चित्रपटासोबत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. परंतु, त्याआधी त्यांनी 90 च्या दशकातील आघाडीच्या म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शकांपैकी एक म्हणून नाव कमावले होते. प्रदीप सरकार यांनी निर्माण केलेल्या प्रमुख संगीत व्हिडिओंमध्ये शुभा मुदगलचा अब के सावन, सुलतान खानचा पिया बसंती आणि भूपेन हजारिकाचा गंगा यांचा समावेश आहे. त्यांनी युफोरियासोबतही काम केले आणि धूम पिचक धूम आणि माएरी सारखे सुपरहिट संगीत व्हिडिओही दिले. या सर्व गाण्यांवर सरकार यांचे सिग्नेचर व्हिज्युअल अपील आणि कथन लिहिलेले आहे.
यशस्वी चित्रपट कारकिर्द - 68 वर्षीय दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी परिणीता आणि लागा चुनरी में दाग सारख्या समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्याच्या डेब्यू चित्रपटाला रिलीज होण्याआधी बऱ्याच उलट सुलट चर्चा होत होत्या. तरीही, हा चित्रपट प्रदीप सरकार यांच्यासाठी यशस्वी पदार्पण ठरला. या चित्रपट निर्मात्याने परिणितासाठी दिग्दर्शनाच्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील जिंकला. त्यांनी राणी मुखर्जी अभिनीत मर्दानी आणि काजोलच्या हेलिकॉप्टर ईला सारख्या महिला-केंद्रित चित्रपटांची निर्मिती केली. दिग्दर्शक म्हणून त्यांची शेवटची 2020 मध्ये रिलीज झालेली दुरंगा ही वेब सीरिज आहे ज्यात गुलशन देवय्या आणि दृष्टी धामी मुख्य भूमिकेत होते.
दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार - त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत दुःखाचे वातावरण पसरले आहे. पहाटेपासूनच त्यांच्या निधनाची वार्ता सिनेजगतात पसरली. मुंबईतील सांताक्रूझमधील स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.