ETV Bharat / entertainment

Vicky kaushal : 'जब तक है जान'मधील 'या' भूमिकेसाठी विक्की कौशलने दिली होती ऑडिशन - vicky kaushal ab tak hai jaan

शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ स्टारर चित्रपट 'जब तक है जान'साठी विक्की कौशलने ऑडिशन दिले होते, परंतु विक्कीला या चित्रपटासाठी नाकारल्यानंतर ही भूमिका 'या' दुसऱ्याच अभिनेत्याकडे गेली.

Vicky kaushal
विक्की कौशल
author img

By

Published : Jun 24, 2023, 4:48 PM IST

मुंबई: बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल त्याच्या 'मसान' चित्रपटापासून त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे आणि आता त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत आहे. विक्की कौशलने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये जेवढी चित्रपट केली आहे त्यासाठी त्याचे कौतुक केल्या जात आहे. कॅटरिना कैफशी लग्न करण्यापूर्वी विक्की कौशल हा पत्नी कॅटरिना कैफचा चित्रपट 'जब तक है जान'मध्ये मोठी भूमिका साकारणार होता. खरचं विक्की हा 'जब तक है जान' या चित्रपटात दिसणार होता यासाठी त्याने ऑडिशन सुद्धा दिले होते. मात्र विकी कौशलची निवड होऊ शकली नाही.

विक्की कौशलने दिली होती ऑडिशन : यश चोप्रा दिग्दर्शित 'जब तक है जान' हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. विक्की कौशलचेही नाव या चित्रपटाशी जोडले गेले असते जर तो ऑडिशन पास झाला असता. विक्कीने या चित्रपटात शाहरुख खानच्या मित्राच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते, परंतु त्याला नकार मिळाला आणि ही भूमिका अभिनेता शारिब हाश्मीकडे गेली. या चित्रपटात शारिबने शाहरुख खानचा मित्र जैनची भूमिका केली होती. विक्कीने सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी फार जास्त प्रयत्न केले आहे. म्हणून आज त्याचे नाव काही मोजक्या सेलेब्रिटीमध्ये घेतले जाते.

शारिबने सांगितला भूमिका मिळण्याचा किस्सा : शारिब हाश्मी विक्की कौशलच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातही आहे. शारिबने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. त्याने मुलाखतीत सांगितले, विक्की कौशल आता फिल्म इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा आहे. 'मी 'संजू' चित्रपटातील संजय दत्तचा मित्र कमलीच्या भूमिकेसाठी ऑडिशनला गेलो होतो, पण ही भूमिका विक्की कौशलला मिळाली. त्यानंतर त्याने पुढे सांगितले की, विक्कीने त्याला सांगितले की 'मी पण जब तक है जान या चित्रपटासाठी जैनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते मात्र ही भूमिका तुला मिळाली. त्यांच्याकडून हे ऐकून मला धक्काच बसला. शारिब हाश्मी विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर जरा हटके जरा बचके या चित्रपटात देखील दिसला आहे. मात्र जर 'जब तक है जान' या चित्रपटातील भूमिका विक्कीला मिळाली असती तर कदाचित आज कॅटरिना आणि विक्कीचे काय झाले असते, हे काही सांगता आले नसते.

हेही वाचा :

  1. kriti sanon Adipurush : क्रिती सेनॉनने स्वतःचे मनोरंजन करत केली एक पोस्ट...
  2. Bigg Boss OTT 2 EP 7 : बेबीका धुर्वे आणि अभिषेक मल्हान यांनी एकमेकांना केली शिवीगाळ; जाद हदीदने आकांक्षा पुरीला दिला लग्नाचा प्रस्ताव
  3. Adipurush Box Office Collection Day 8 : आठव्या दिवशी ‘आदिपुरुष’या चित्रपटाच्या कमाईत झाली फार मोठी घसरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.