ETV Bharat / entertainment

Ecxlusive interview with Ajay Deogan : ‘रनवे ३४’ हा सत्य घटनांवर आधारित पहिला ‘एव्हिएशन थ्रिलर’

अजय देवगणचा ‘रनवे ३४’ हा ( Ecxlusive interview with Ajay Deogan ) नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन अजयचे असून त्याने यात प्रमुख भूमिकाही केली आहे. ईटीव्ही भारत प्रतिनिधीचे कीर्तिकुमार कदम यांच्याशी अजय देवगणने दिलखुलास गप्पा मारल्या.

Runway 34
Runway 34
author img

By

Published : Apr 26, 2022, 12:29 PM IST

मुंबई : साधारण एकतीस वर्षांपूर्वी ‘फूल और कांटे’ मध्ये एकाचवेळी दोन चालत्या बाईक्सवर उभा राहून अजय देवगणने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टी ने ‘रनवे ३४’ च्या ट्रेलर अनावरणप्रसंगी सांगितले होते की अजय देवगण ला दिग्दर्शक बनायचे होते आणि अपघाताने तो अभिनेता बनला, अर्थातच चांगला. रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांची लहानपणापासून घट्ट मैत्री आहे. दोघांचेही वडील ॲक्शन डायरेक्टर होते आणि रोहित आणि अजय दोघेही उत्तमप्रकारे स्टंट्स करू शकतात. असो. तर चित्रपटांतून अभिनय करता करता अजय ने निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले

Ajay deogan
रनवे ३४

आणि चित्रपटांच्या दिग्दर्शनाचीही धुरा वाहिली. ‘यु मी और हम’ आणि ‘शिवाय’ हे अजय देवगणने दिग्दर्शित केलेले दोन चित्रपट. आता त्याचे दिग्दर्शन असलेला ‘रनवे ३४’ हा तिसरा चित्रपट येऊ घातलाय. तर अजय देवगणचा ‘रनवे ३४’ हा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन अजयचे असून त्याने यात प्रमुख भूमिकाही केली आहे. ईटीव्ही भारत प्रतिनिधीचे कीर्तिकुमार कदम यांच्याशी अजय देवगणने दिलखुलास गप्पा मारल्या.

‘रनवे ३४’ चित्रपटात अभिनयाबरोबरच दिग्दर्शन करणे कठीण होते का? त्यातच तू त्याचा निर्माताही आहेस.....
मी ते कठीण म्हणणार नाही पण खूप हार्ड वर्क करावे लागते. उत्तम प्रकारे प्लॅनिंग करावे लागते. ज्यात माझी टीम पारंगत आहे. कॅमेरा सेट करणे, सीनची तयारी करणे, सर्वांच्या अभिनयावर लक्ष देणे/ठेवणे, स्वतः अभिनय करणे, सीन संपल्यावर मॉनिटरवर जाऊन तो व्यवस्थित झालाय की नाही याची खातरजमा करणे, पुन्हा पुढच्या सीनची तयारी करणे ई. अनेक गोष्टी एकाचवेळी कराव्या लागतात. त्यासाठी नक्कीच खूप मेहनत करावी लागते आणि मी हार्ड वर्क करणे एन्जॉय करतो. ‘रनवे ३४’ हा सत्य घटनांवर आधारित असून भारतातील पहिला ‘एव्हिएशन थ्रिलर’ आहे.

जवळपास सात वर्षांनंतर तू अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करतोय. त्यांना दिग्दर्शित करण्याचा अनुभव कसा होता?
पण, आम्ही भेटत असतो. हो, म्हणजे आता इतक्या वर्षांनंतर एकत्र काम करतोय याचा आनंद नक्कीच आहे. परंतु आमच्या भेटी होत असतात. मी तर त्यांना लहापानापासून ओळखतोय. त्यामुळे असं काही जाणवलं नाही की इतक्या वर्षांनंतर एकत्र काम करतोय. त्यामुळे त्यांना ‘ॲक्शन’ आणि ‘कट’ बोलणे हे ‘नॉर्मल’ वाटले. कारण त्यांच्यासोबत मी एकदम ‘कम्फर्टेबल झोन’ मध्ये असतो. त्यांच्यासोबत काम करताना प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. त्यांना ११ वाजता ची शिफ्ट सांगितली तरी ते ९ वाजताच सेटवर हजर होतात. त्यामुळे इतरांची बरीच धावपळ होते ही गोष्ट वेगळी. परंतु ते दिग्दर्शकाचे म्हणणे ऐकून घेतात आणि त्याच्या व्हिजन प्रमाणेच अभिनय सादर करतात. ते अतिशय ‘प्रोफेशनल’ कलाकार आहे आणि अभिनयाव्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीत लुडबुड करीत नाहीत. खरंतर त्यांचे व्यक्तिमत्व भारावून टाकणारे आहे. परंतु, मला त्यांच्यासोबत काम करताना दडपण जाणवलं नाही. आमची खूप जुनी ओळख आहे. म्हणून कदाचित पण मला त्यांना दिग्दर्शित करताना मजा आली कारण ते मला अभिप्रेत असलेलेच करीत होते.

Ajay deogan
ईटीव्हीच्या प्रतिनिधींसोबत

हेही वाचा - Nawazuddin cleverness : नवाजुद्दीनला मिळाली नाही 'शूल'साठी ठरलेली रक्कम, वाचा - चतुराईने केली कशी वसुली?

‘रनवे ३४’ हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे कारण काय?
याची कथा माझ्याकडे साधारण अडीच-तीन वर्षांपूर्वी आली होती. मला कथानक आवडलं होतं. परंतु मी त्यांना त्यात काही बदल करण्यास सांगितले होते. त्यानंतर वर्षभर मी बिझी होतो आणि त्यानंतर कोरोना महामारी आली. लॉकडाऊनमध्ये त्याची आठवण आली आणि मी त्यांना विचारले की मी सांगितलेले बदल केलेत का? ते हो म्हणाले आणि सर्वांनी मिळून त्यावर दोन-तीन महिने काम केले. खरंतर हा चित्रपट मला अभिनेता म्हणून ऑफर झाला होता. परंतु ते कथानक इतके उत्कृष्ट बनले की मी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. हे कथानक खूप क्लिष्ट आहे प्रेझेंट करण्याच्या दृष्टीने, म्हणून मी दिग्दर्शनही केले. मला नेहमीच कठीण वाटणारे चित्रपट दिग्दर्शित करायला आवडतात.

या चित्रपटाच्या कास्टिंग वर काही सांगता येईल तर....
(हसत) अर्थातच मी भूमिकेला साजेसा होतो म्हणून त्यात अभिनयसुद्धा केला. रकुल (प्रीत सिंग) सोबत मी ‘दे दे प्यार दे’ मध्ये काम केले होते. त्यामुळे तिच्या अभिनयक्षमतेबाबत मला कल्पना होती. या चित्रपटात तिने अप्रतिम काम केलंय. ‘दे दे प्यार दे’ मधील तिची भूमिका हलकी फुलकी होती. परंतु या चित्रपटात तिने तणावपूर्ण वातावरणातील तणावग्रस्त वैमानिकाची भूमिका अत्यंत तन्मयतेने वठविली आहे. माझ्या अपेक्षेच्या पुढे जाऊन तिने काम केलंय. बच्चन सरांबद्दल सांगायचं झालं तर, यातील भूमिकेसाठी फक्त आणि फक्त तेच माझ्या डोळ्यासमोर होते. भूमिकेत हवे असणारे व्यक्तिमत्व त्यांच्याकडे आहे तसेच गंभीर प्रसंगात प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे त्यांच्याशिवाय ही भूमिका दुसरा कोणी इतक्या ताकदीने करू शकला नसता असे माझे मत आहे.

याआधी या चित्रपटाच्या नाव ‘मे डे’ होते. ते बदलण्यामागचे कारण काय?
वैमानकीय भाषेत ‘मे डे’ म्हणजे ‘फायनल डिस्ट्रेस कॉल’. जेव्हा विमान आकाशात असताना संकटात सापडते आणि सर्व प्रयत्न करून झाल्यावर शेवटचा ‘कोड’ पाठविला जातो तो म्हणजे ‘मे डे’. परंतु आपल्याकडे अनेकांना याबद्दल माहिती नाहीये. तरीसुद्धा आम्ही त्याची व्यवस्थित माहिती देण्याचे ठरविले होते. परंतु एके दिवशी एक अतिशय सुविद्य आणि सुसंस्कृत गृहस्थ मला भेटले आणि म्हणाले की ‘मे डे’ म्हणजे १ मे ला कामगार दिवस असतो त्याबद्दल हा चित्रपट आहे का? ते ऐकून मला धक्काच बसला. ‘मे डे’ बद्दल अनभिज्ञ आहे तर सामान्य प्रेक्षकांचे काय होईल. म्हणून मग आम्ही नाव बदलले आणि ‘रनवे ३४’ ठेवले. विमानतळावरील ३४ नंबरच्या रनवे वर चित्रपटातील थरार घडतो.

हेही वाचा - इंडियन आयडॉलची रनरअप सायली कांबळेने बॉयफ्रेंड धवलसोबत बांधली लग्नगाठ

चित्रपटात ‘ब्लाइंड लँडिंग’ आहे. तू कधी ‘ब्लाइंड लँडिंग’ केले आहेस का?
(हसत) मी कधी विमान उडविलेच नाही तर ‘ब्लाइंड लँडिंग’ चा प्रश्नच उद्भवत नाही. (पुन्हा हसत) हो. आयुष्यात बरीच ‘ब्लाइंड लँडिंग’ केलीयेत. बऱ्याच रिस्कस घेतलेल्या आहेत. त्यातून तावून सुलाखूनही निघालो आहे.

शूट करताना तू सात सात, अकरा अकरा कॅमेरे लावले होतेस, त्यामागील हेतू काय होता?
मी याआधीही अनेक कॅमेरे लावून शूटिंग केले आहे. परंतु ‘रनवे ३४’ मध्ये आम्ही खऱ्याखुऱ्या ‘कॉकपीट’ मध्ये शूट केलंय. मला कॉकपीट ची एरिया मोठी करायची नव्हती कारण संकटकाळी त्या लहानश्या जागेत होणारी घुसमट मला आणि रकुल ला अनुभवायची होती आणि ती भावना प्रत्यक्षात कॅमेऱ्यात उतरवायची होती. तसेच चित्रपटात कॉकपीट मध्ये बराच ड्रामा आहे तो मला पकडायचा होता. तसेच तणावग्रस्त प्रसंगांमधील चेहऱ्यावरील भाव नीट पकडायचे होते. कदाचित तेच भाव रिटेक मध्ये अथवा कॅमेरा शिफ्ट करून शूट केल्यावर मिळत नाहीत वा सापडत नाहीत. मला उस्फुर्तपणे आलेल्या भावना टिपायच्या होत्या आणि एकाधिक कॅमेरा प्लेसमेंट मुळे ते शक्य झालं. अर्थातच खूप प्लॅनिंग आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झालं.

या चित्रपटाच्या चित्रीकरण लॉकडाऊन मध्ये झाले, त्याचा कसा अनुभव होता?
अर्थातच प्रत्येकाला थोडीफार काळजी वाटत होती. परंतु आम्ही सर्व प्रकारच्या सेफ्टीसकट शूटिंग केलं. इतकं असूनही रकुल ला कोरोना झाला. त्यातच अमिताभ सरांच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे होते. परंतु मर्यादित क्रूसह आणि त्यावेळी शासनाने दिलेल्या सूचना पाळत शूटिंग पार पडलं आणि येत्या २९ एप्रिलला आमचा सिनेमा रिलीज होतोय.

बॉक्स ऑफिसचं काही दडपण आहे का?

प्रत्येकाची बॉक्स ऑफिसची गणितं असतात. प्रत्येकाला आपापल्या चित्रपटाच्या भवितव्याबद्दलच्या अपेक्षा असतात तशा माझ्याही आहेत. परंतु माझा चित्रपट इतके इतके कमावेल असे काही मी सांगणार नाही. परंतु, प्रत्येकाला हा सिनेमा आवडावा ही माझी अपेक्षा आहे. कारण हा नेहमीचा मारधाड बिग बजेट ॲक्शन चित्रपट नाहीये. अर्थात आमचा चित्रपट बिग स्केल वर बनविला असून अशा चित्रपटांचा विशिष्ट प्रेक्षकवर्ग असतो आणि त्यांना तो नक्कीच आवडेल.

हेही वाचा - कॅन्सर शस्त्रक्रियेपूर्वी छवी मित्तलने केला डान्स, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.