ETV Bharat / entertainment

Esha Talwar excited for Mirzapur 3 : 'मिर्झापूर 3'साठी ईशा तलवार उत्सुक, गुड्डू पंडित आणि गोलू गुप्ताशी घेणार टक्कर - अभिनेत्री ईशा तलवार मिर्झापुर मालिकेत

मिर्झापुर वेब सिरीजचा तिसरा सिझन येत असून यात अभिनेत्री ईशा तलवार आक्रमक भूमिकेत दिसणार आहे. यात ती माधुरी यादवची भूमिका साकारत आहे. सीझन 3 मध्ये ती मुन्ना भैय्याच्या विधवेच्या भूमिकेत दिसणार असून पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती गुड्डू पंडितशी पंगा घेणार आहे.

Esha Talwar excited for Mirzapur 3
अभिनेत्री ईशा तलवार मिर्झापुर मालिकेत
author img

By

Published : Jun 5, 2023, 4:35 PM IST

मुंबई - मिर्झापूर या गाजलेल्या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पहिल्या भागापासूनच या वेब सिरीजची प्रचंड लोकप्रियता पाहायला मिळाली. या मालिकेच्या तिसऱ्या भागासाठी अभिनेत्री ईशा तलवार प्रचंड उत्सुक आहे आणि तिने या नवीन हंगामात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

'मिर्झापूर' ही कथा आहे संपूर्ण जिल्ह्यावर जरब असणाऱ्या मिर्झापूरचा राजा कालीन भैय्या विरुद्ध पंडित ब्रदर्स, गुड्डू आणि बबलू यांची. मिर्झापूरच्या सिंहासनाकडे नेणारी, सत्तेची लढाई म्हणून सुरुवातीला ज्या गोष्टी सुरू झाल्या आता त्याचा उत्तरार्ध सुरू होणार आहे. निर्मात्यांनी अद्याप रिलीझची तारीख जाहीर केलेली नाही, तरीही हा शो या वर्षी प्रदर्शित होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

ईशाने खुलासा केला की 'मिर्झापूर 3' ही अनेक मनोरंजक वळणे असणारी उत्कंठावर्धक मालिका आहे. यात अनेक ट्विस्ट आणि टर्न आहेत. ही मालिका म्हणजे बदला घेण्याची एक मसालेदार पाककृती आहे. तिच्या अनुभवाविषयी बोलताना ईशा म्हणाली की, 'माधुरी यादवला आपण सीझन 2 मध्ये पाहिले होते की तिने पंजक त्रिपाठीने साकारलेल्या कालीन भैय्याकडील त्याची शक्ती संपुष्ठात आणली होती. त्यामुळे तो माधुरीला चांगलाच ओळखून आहे. ज्यावेळी अशी महत्त्वाची व्यक्तीरेखा तुम्ही साकारत असता तेव्हा त्यातून निर्माण होणारे नाट्य रंजक होणार हे नक्कीच असते'.

अभिनेत्री ईशा तलवार मिर्झापुर मालिकेत माधुरी यादवची भूमिका साकारत आहे. सीझन 3 मध्ये ती मुन्ना भैय्याच्या विधवेच्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती गुड्डू पंडित (अली फजल) आणि गोलू गुप्ता यांच्याशी लढणार आहे.

ती अलीकडेच होमी अदजानिया दिग्दर्शित 'सास बहू और फ्लेमिंगो'मध्ये दिसली होती. यात डिंपल कपाडिया देखील सावित्रीच्या भूमिकेत झळकल्या होत्या. यात ती ड्रग्ज कार्टेल चालवते. सावित्रीच्या सून म्हणून अंगिरा धर आणि ईशा यांनी भूमिका केल्या होत्या तर मुलीच्या भूमिकेत राधिका मदन झळकली होती. 'सास बहू और फ्लेमिंगो'मध्ये नसीरुद्दीन शाह, आशिष वर्मा, वरुण मित्रा, उदित अरोरा, दीपक डोबरियाल, मोनिका डोगरा आणि जिमित त्रिवेदी देखील आहेत. हे सध्या डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रवाहित होत आहे.

हेही वाचा - Sushmita Sens Upcoming Web Series : सुष्मिता सेनच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर वेब सीरिज 'आर्या 3'चे शुटिंग पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.