मुंबई - Elvish Yadav Snake Venom Case: 'बिग बॉस ओटीटी 2' विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव सापाच्या विषाच्या प्रकरणात अडकला आहे. त्याच्या आणखी अडचणी वाढत होत आहेत. राजकारणी आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी एल्विशवर उत्तर प्रदेशातील नोएडा येथील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर याबद्दल तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. एल्विशला राजस्थानमध्ये पकडण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्याला विचारपूस केली होती. दरम्यान त्याला पोलिसांकडून पुन्हा एकदा बोलवणं येऊ शकते.
एल्विश यादवची पोलिसांकडून पुन्हा चौकशी होऊ शकते : मिळालेल्या माहितीनुसार सापाच्या विष प्रकरणी नोएडा पोलीस एल्विश यादवला चौकशीसाठी बोलावू शकतात. पोलीस त्याला नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहेत. याप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पाचपैकी तीन आरोपींनाही पोलीस 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करेल असं सध्या सांगितलं जात आहे. एल्विशचा अटक झालेल्या आरोपींशी काही संबंध आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. रिपोर्टनुसार, एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, ' या रॅकेटचा शोध घेण्यासाठी आम्हाला किमान तीन आरोपींची चौकशी करण्याची गरज आहे. आमच्याकडे काही पुरावे आहेत. आम्ही सध्या अटक झालेल्या आरोपीचा एल्विश यादवशी काय संबंध आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
एल्विशनं आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं सांगितलं : गेल्या आठवड्यात, सापाच्या विषाच्या प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर, एल्विशला राजस्थानमधील कोटा येथील चेकपोस्टवर थांबवले होते. मात्र, नंतर एल्विशची सुटका लगेच करण्यात आली. याआधी एल्विशनं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यानं सांगितलं होत की, त्याच्यावरील सर्व आरोप हे निराधार आहे . या व्हिडिओमध्ये त्यानं म्हटलं होतं की, 'मी सकाळी उठलो आणि पाहिले की मीडियामध्ये माझ्याविरोधात सापाच्या विष प्रकरणी अनेक प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझ्यावरील सर्व आरोप निराधार, खोटे असून त्यात एक टक्काही तथ्य नाही'. याशिवाय एल्विश नुकतचं सांगितलं आहे की, याप्रकरणी शांत बसणार नाही, तो मेनका गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं त्यानं सांगितलं आहे.
हेही वाचा :