ETV Bharat / entertainment

बुरख्यातील एलनाझ नौरोजीने इराणी महिलांच्या समर्थनार्थ कॅमेऱ्यासमोर उतरवले शरीरावरील कपडे

author img

By

Published : Oct 12, 2022, 12:12 PM IST

Updated : Oct 12, 2022, 12:21 PM IST

इराणमधील हिजाब विरोधामध्ये बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजीने कॅमेऱ्यासमोर कपडे उतरवताना महिलांच्या हक्कांबद्दल भाष्य केलेआहे. अभिनेत्रीने तिचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

एलनाझ नौरोजी
एलनाझ नौरोजी

मुंबई - मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी देखील इराणमधील हिजाब आंदोलनात सामील झाली आहे. एलनाजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, एलनाज बुरखा घातलेली दिसत आहे आणि कॅमेऱ्यासमोर तिचे सर्व कपडे हळूहळू उतरवते. एलनाजने हा व्हिडीओ शेअर करून महिलांशी संबंधित अधिकारांबद्दल भाष्य केले आहे.

बुरख्यातून बिकिनीमध्ये आली अभिनेत्री - एलनाज नौरोजीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आपले कपडे काढताना दिसत आहे आणि शेवटी तिच्या अंगावर फक्त काळी बिकिनी उरते, पण शेवटी ती आपली ब्रा देखील काढून टाकते.

मी नग्नतेचा प्रचार करत नाही - व्हिडिओ शेअर करत एलनाजने लिहिले की, 'महिला, ती जगातील कोणत्याही भागाची असली तरी तिला तिच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे. कोणी महिला किंवा पुरुष स्त्रीयांनी कोणते कपडे घालावेत याचा सल्ला देऊ शकत नाहीत.'

एलनाज पुढे म्हणाल्या, 'प्रत्येकाचे स्वतःचे मत असते, त्यांची स्वतःची धारणा असते आणि त्यांचा आदर करणे देखील आवश्यक आहे, लोकशाही म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती, प्रत्येक स्त्रीला ती तिच्या अंगावर काय कपडे घालावेत हे ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे, मी मी येथे नग्नतेचा प्रचार करत नाही, मी निवड स्वातंत्र्याचा प्रचार करत आहे.'

एलनाज नौरोजी कोण आहे? - एलनाझ एक इराणी आणि जर्मन अभिनेत्री आहे, परंतु एलनाझ प्रामुख्याने भारतीय चित्रपट उद्योगात सक्रिय आहे. इराणमधील तेहरान येथे जन्मलेली एलनाझ वयाच्या 8 व्या वर्षी ती आपल्या कुटुंबासह जर्मनीला गेली. एलनाजला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची आवड होती. एलनाजने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती.

शाहरुख-सलमानसोबत केलंय काम - एलनाजने बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खानसोबतही काम केले आहे. त्याचबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लोकप्रिय वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'मध्येही काम करताना दिसली आहे. याशिवाय एलनाजने 'खिद्दो खुंडी गेंद' आणि 'हॉकी' या पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

हिजाब प्रकरण म्हणजे काय? - 13 सप्टेंबरला महसा तिचा भाऊ आणि नातेवाईकांसह तेहरान मेट्रो स्टेशनवरून येत होती की तिला अटक करण्यात आली आहे. हिजाब हेडस्कार्फ आणि साधे कपडे घालणाऱ्या महिलांसाठी इराणच्या कठोर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महसाला अटक करण्यात आली होती. महसा तीन दिवस कोमात राहिली आणि नंतर तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा - क्रिकेटर शिखर धवनची बॉलिवूड एन्ट्री, फिल्ममधील फोटो व्हायरल

Last Updated : Oct 12, 2022, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.