मुंबई - जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'एक व्हिलन रिटर्न' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहेत. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये सर्व पात्रांचे दमदार लूक पाहायला मिळत आहेत. चित्रपटाच्या स्टारकास्टने चित्रपटाचे पोस्टर शेअर करून असेच कॅप्शन दिले आहे. यासोबतच चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार याचीही माहिती देण्यात आली आहे. मोहित सुरी दिग्दर्शित 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल तब्बल 9 वर्षांनी आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर तारासोबतचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. एका पोस्टरमध्ये हे कपल बाईकवर बसलेले दिसत आहे तर दुसऱ्या पोस्टरमध्ये ते उभे आहेत. हे पोस्टर्स शेअर करत अर्जुन कपूरने लिहिले आहे, अर्जुन- हिरो-हिरोईन का जमाना गया, आता खलनायकाचा जयजयकार करण्याची वेळ आली आहे! ( हिरो-हिरोईनचा काळ संपला, आता व्हिलनची वेळ आली आहे ), #EkVillainReturns, उद्या ट्रेलर रिलीज होणार आहे, हा चित्रपट २९ जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
त्याचवेळी तारानेही हेच फोटो शेअर करून अर्जुन कपूरसारखे कॅप्शन दिले आहे. दिशाने जॉन अब्राहमसोबत पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नायक आणि नायिकेची कहाणी खूप आहे, आता खलनायकाची कथा जाणून घेण्याची वेळ आली आहे'.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दिशा, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे प्रमोशन सुरू होते. यापूर्वी या सर्व स्टार्सनी खलनायकाचा मुखवटा घालून चित्रपटाचे प्रमोशन केले होते.
9 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन' या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांचा समावेश होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलचा खलनायक तब्बल 9 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार का हे पाहावं लागेल.
हेही वाचा - अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'मधील पहिले गाणे रिलीज