नवी दिल्ली - Dussehra 2023: सालाबाद प्रमाणे ऐतिहासिक लाल किल्ल्यावर दिल्लीच्या सर्वात मोठ्या रामलीलाचं आयोजन केलं जात. अनेक सेलेब्रिटी, व्हीआयपी आणि राजकारण्यांची यासाठी उपस्थिती असते. यंदा पहिल्यांदाच रावण दहनाचा मान महिलेला देण्याचा निर्णय रामलीला समितीच्या आयोजकांनी घेतला होता. त्यानुसार अभिनेत्री कंगना रणौत प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. तिच्या हस्ते रावण दहनाचा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
-
#WATCH | Delhi: Bollywood actor Kangana Ranaut attends 'Ravan Dahan' at Red Fort#Dussehra pic.twitter.com/skbsc2Pj4T
— ANI (@ANI) October 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Delhi: Bollywood actor Kangana Ranaut attends 'Ravan Dahan' at Red Fort#Dussehra pic.twitter.com/skbsc2Pj4T
— ANI (@ANI) October 24, 2023#WATCH | Delhi: Bollywood actor Kangana Ranaut attends 'Ravan Dahan' at Red Fort#Dussehra pic.twitter.com/skbsc2Pj4T
— ANI (@ANI) October 24, 2023
लव कुश रामलीला समितीने आयोजित केलेल्या या उत्सवासाठी अभिनेत्री कंगना रणौत हिच्या शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल व्हीके सक्सेना देखील उपस्थित होते. या सोहळ्यासाठी कंगनानं पारंपरिक साडी नेसली होती. भरजरी साडीसह दागिने आणि मेकसह सजलेली कंगना खूपच सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात कंगनानं ‘जय श्री राम’चा जयघोषही केला.
-
#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal performed 'Ravan Dahan' organised by Luv Kush Ramleela Committee at Red Fort in Delhi. pic.twitter.com/MZqwB1YcKo
— ANI (@ANI) October 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal performed 'Ravan Dahan' organised by Luv Kush Ramleela Committee at Red Fort in Delhi. pic.twitter.com/MZqwB1YcKo
— ANI (@ANI) October 24, 2023#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal performed 'Ravan Dahan' organised by Luv Kush Ramleela Committee at Red Fort in Delhi. pic.twitter.com/MZqwB1YcKo
— ANI (@ANI) October 24, 2023
सोमवारी कंगनानं जाहीर केलं होतं की, दिल्लीतील प्रसिद्ध लव कुश रामलीला समितीनं आयोजित केलेल्या लाल किल्ला मैदानावर रावणाच्या पुतळ्याचे दहन करणारी ती पहिली महिला असणार आहे. कंगनानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली होती. यात तिनं सांगितलं होतं की, लाल किल्ल्यावर दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाच्या ५० वर्षांच्या इतिहासात यंदाची पहिलीच वेळ असेल जेव्हा एखादी महिला रावणाच्या पुतळ्याला दहन करेल.
दरम्यान, कंगना सध्या तिच्या आगामी 'तेजस' या एक्शन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. हा चित्रपट तेजस गिल या हवाई दलाच्या वैमानिकाच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रेरणा आणि अभिमानाची भावना जागृत करण्याचा उद्देशानं करण्यात आलीय. सर्वेश मेवारा दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित 'तेजस' हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच कंगना 'इमर्जन्सी' या आगामी चित्रपटाची निर्मिती तिच्या मणिकर्णिका प्रॉडक्शन हाऊसच्या वतीनं करणार आहे. यामध्ये ती इंदिरा गांधींची भूमिका साकारणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शनही ती करणार आहे. तिच्या हा महत्त्वकांक्षी चित्रपट पुढील वर्षी रिलीज होईल.
हेही वाचा -
2. Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण'च्या 8व्या सीझनमध्ये झळकणार काजोल आणि राणी मुखर्जी...
3. Deva Release Date : शाहीद कपूरच्या आगामी 'देवा' चित्रपटाची रिलीज तारीख जाहीर