मुंबई - Dunki Vs Salaar Advance Booking : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शाहरुख खान स्टारर 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होत आहे. याशिवाय प्रभास स्टारर 'सालार पार्ट 1- सीझफायर' हा 22 डिसेंबर रोजी रिलीज रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. सध्या या दोन्ही चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. या चित्रपटाची टक्कर बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळेल. कुठला चित्रपट प्रेक्षकांवर जादू करणार हे काही दिवसात समजेल. 'सालार' हा चित्रपट 400 कोटीच्या बजेटमध्ये बनला आहे, तर 'डंंकी' हा 120 कोटीमध्ये तयार झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'डंकी' आणि 'सालार' चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग : शाहरुख खानच्या 'डंकी'नं देशांतर्गत 286413 तिकिटे विकली असून, आगाऊ बुकिंगद्वारे 8.29 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दुसरीकडे 'सालार'नं देशांतर्गत 288926 तिकिट विकली आहे. यासह या चित्रपटानं रिलीजपूर्वी 6.81 कोटीची कमाई केली आहे. 'सालार'ची आगाऊ बुकिंग 15 डिसेंबरपासून सुरू झाली आहे तर 'डंकी' या चित्रपटाची आगाऊ बुकिंग ही 16 डिसेंबर रोजी सुरू झाली आहे. सध्या कमाईच्या बाबतीत 'डंकी'नं 'सालार'ला मागे टाकले आहे. किंग खान स्टारर 'डंकी' चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'डंकी' 'सालार'वर भारी : गिरीश वानखेडे यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, 'सालार'च्या तुलनेत 'डंकी'ची स्थिती चांगली दिसत आहे'. दोन्ही चित्रपटांच्या ट्रेलरवर नजर टाकली तर 'डंकी'ला चांगला प्रतिसाद मिळाला असून चालू वर्षात शाहरुख खाननं 'पठाण' आणि 'जवान'द्वारे अनेकांची मनं जिंकली आहे. शाहरुख खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणार असं सध्या दिसत आहे. सालार देशभरात 4,338 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे, तर डिंकी 9665 स्क्रीन्सवर रिलीज होईल. 'डंकी' स्क्रीनच्या बाबतीतही 'सालार'वर भारी पडला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानशिवाय बोमन इराणी, तापसी पन्नू आणि विकी कौशल आणि इतर कलाकार आहेत.
हेही वाचा :