मुंबई - Dunki movie box office collection : अभिनेता शाहरुख खान स्टारर 'डंकी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी जवळपास जगभरात 58 कोटीची जोरदार कमाई केली. आता हा चित्रपट रिलीजच्या सातव्या दिवसात आहे. दरम्यान या चित्रपटानं रिलीजच्या सहाव्या दिवशी जगभरात 250 कोटींचा आकडा पार केला आहे. 'डंकी' चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलंय. हा चित्रपट सध्या प्रभास स्टारर 'सालार' जोरदार बॉक्स ऑफिसवर टक्कर देत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी, सतीश शहा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
-
*Dunki Day 6 Night Occupancy: 30.54% (Hindi) (2D) #Dunki https://t.co/TvlGfYElEe*
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">*Dunki Day 6 Night Occupancy: 30.54% (Hindi) (2D) #Dunki https://t.co/TvlGfYElEe*
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 26, 2023*Dunki Day 6 Night Occupancy: 30.54% (Hindi) (2D) #Dunki https://t.co/TvlGfYElEe*
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 26, 2023
'डंकी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं पहिल्या दिवशी 29.2 कोटी, दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथ्या दिवशी 30.7 कोटी, पाचव्या दिवशी 24.32 कोटी आणि सहाव्या दिवशी 10 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं 6 दिवसात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 140.20 कोटींची कमाई केली आहे. 'डंकी' सातव्या दिवशी 57 लाखाची कमाई करू शकतो. आता हा चित्रपट देशांतर्गत 200 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील होणार असं सध्या दिसत आहे. या चित्रपटामध्ये 'किंग खान'चा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. 'डंकी' चित्रपटाला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटामधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे किंग खानच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.
'डंकी' चित्रपटाची एकूण कमाई
पहिला गुरुवार पहिला दिवस - 29.2 कोटी
पहिला शुक्रवार दुसरा दिवस - 20.12 कोटी
पहिला शनिवार तिसरा दिवस - 25.61 कोटी
पहिला रविवार चौथा दिवस - 30.7 कोटी
पहिला सोमवार पाचवा दिवस - 24.32 कोटी
पहिला मंगळवार सहावा दिवस - 10 कोटी
पहिला बुधवार सातवा दिवस 57 लाख
एकूण कलेक्शन - 140.52 कोटी
हेही वाचा :